लहानग्या कुत्र्याचा गोंडस बंड पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड!’

काही कुत्र्यांना एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. या कुत्र्यांपैकी एक कुत्रा यावेळी तेथून पसार होण्याच्या प्रयत्नात आहे.

लहानग्या कुत्र्याचा गोंडस बंड पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड!’
एक लहानसा कुत्रा तेथून पळ काढण्याच्या प्रयत्नात आहे. (Photo : Twitter/ @buitengebieden)

आपल्याकडे अनेक प्राणी पळाले जातात. गाय, शेळी, मेंढी, कुत्रा, मांजर, पोपट असे अनेक प्राणी आपण कोणाच्या ना कोणाच्या घरात पाहतो. मात्र यापैकी कुत्रा हा असा प्राणी आहे जो माणसाचा सर्वात जवळ असून याला माणसाचा खरा मित्र म्हटले गेले आहे. बऱ्याच लोकांना कुत्रे पाळायला आवडतात आणि ते त्यांना कुटुंबातील सदस्य मानतात. इतकेच नव्हेतर काही लोक कुत्र्यांना आपली मुले मानतात. कुत्रा हा माणसापेक्षा जास्त इमानदार आणि मायाळू असतो.

दररोज सोशल मीडियावर हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यामध्ये अधिक व्हिडीओ हे प्राण्यांचे असतात. लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ बघायला प्रचंड आवडतात. त्यातही जर हे व्हिडीओ कुत्र्याचे असतील, तर ते जास्त प्रमाणात बघितले जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक कुत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही कुत्र्यांना एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. या कुत्र्यांपैकी एक कुत्रा यावेळी तेथून पसार होण्याच्या प्रयत्नात आहे.

काम करावं तर असं! मुंबईच्या मुसळधार पावसातून ऑर्डर पोहचवण्यासाठी Swiggy डिलिव्हरी बॉयचा घोड्यावरून प्रवास

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की बऱ्याच कुत्र्यांना या पिंजऱ्यामध्ये एकत्रित ठेवण्यात आलंय. पण त्यातील एक लहानसा कुत्रा तेथून पळ काढण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी तो पिंजऱ्यावर चढत आहे. या कुत्र्याने एक छानसे टीशर्ट घातलेले आहे. सुरुवातीला आजूबाजूचे कुत्रे या लहानश्या कुत्र्याच्या कृतीकडे दुर्लक्ष करतात. पण नंतर जसजसा तो वर चढत जातो तसे इतर कुत्रेही एक एक करून पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात.

ऐकावं ते नवलंच! ‘या’ महापौराने चक्क मगरीशी बांधली लग्नगाठ; जाणून घ्या, काय आहे प्रकरण

हा मजेशीर व्हिडीओ @buitengebieden या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच, ‘आजपासून बंड सुरू झाले..’ असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १२.३ मिलिअनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून जवळपास ५ लाख लाइक्स मिळाले आहेत. तसेच ७१ हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The rebellion started today video of little dog is viral on social media pvp

Next Story
“…बदल्यात तुमच्या पाया पण पडू”; अजित पवारांचा Video शेअर करत निलेश राणेंचं वक्तव्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी