कॅनडाच्या कॅलगरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका नोकराने स्वत: जेसीबी नेऊन आपला मालकाचा बंगला पडल्याची घटना घडली आहे. मालकाने आपल्याला नोकरीवरून काढून टाकल्याचा राग आल्याने नोकराने हे कृत्य केले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

चोरीचा आरोप असलेल्या या नोकराला त्याच्या मालकाने नोकरीवरून काढून टाकले. यामुळे नोकराने संतापून तलावाच्या काठावरील मालकाचा बंगला जेसीबीच्या मदतीने पाडला. कॅनडातील या घटनेचा व्हिडीओ डॉन टॅपस्कॉट नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. त्याने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, एका संतप्त कर्मचाऱ्याने आपल्या मालकाचे तलावाजवळ घर पाडले आहे. काय झाले याबद्दल कोणाकडे काही माहिती आहे का?

कॅनडामध्ये नोकराकडून मालकाचे घर पाडल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत २ लाख ७४ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हायरल व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला पाच हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय ५०० हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

Viral Video : खोल समुद्रात फडकावला तिरंगा; भारतीय तटरक्षक दलाची कामगिरी पाहून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक केली. या कर्मचाऱ्याचे वय ५९ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. बंगला तोडून कर्मचाऱ्याने मालकाला मोठा आर्थिक झटका दिला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना, एका युझरने लिहिले की, ‘प्रामाणिकपणे, आपण सध्या ज्या मानसिक आरोग्य संकटात आहोत त्याबद्दल आपण पुरेसे बोलत नाही. हे सामान्य वर्तन नाही.’ त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले की, ‘त्याला चांगला पगार देऊन नोकरीवर ठेवायला हवे होते.’