नुकतंच स्क्विडवर्ड टेन्टेकल्स या टिकटॉक वापरकर्तीने तिच्या लग्नाच्या आमंत्रणांबद्दल एक मजेदार कथा शेअर केली. या आमंत्रण पत्रिकांची ऑर्डर मिळाल्यानंतर लगेचच वधूने ही पोस्ट शेअर केली. तथापि, लग्नाच्या आमंत्रणात पॉर्नहब युआरएलचा समावेश होता हे लक्षात येताच तिचा उत्साह क्षणार्धात मावळला.

ही गोष्ट शेअर करण्यासाठी तिने एक व्हिडीओ तयार केला. त्यात तिने म्हटलंय, “आज मला माझ्या लग्नाच्या आमंत्रणाच्या पत्रिका मिळाल्या. मी खूपच उत्साहात आहे. मात्र मी एक खूप मोठी चूक केली आहे, जी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मला आशा आहे की यामुळे इतर नववधू ही चूक टाळतील, कारण ही अतिशय सामान्य गोष्ट आहे.”

URL of the PornHub website on wedding card
Photo : Social Media

यानंतर ती आरएसव्हीपी (RSVP) कार्डकडे कॅमेरा फिरवते. यामध्ये पाहुण्यांना एका पॉर्नहब साइटवर जाण्यास सांगितलं आहे. या महिलेले सांगितले की तिने त्यांच्या समारंभासाठी योग्य युआरएल प्राप्त होईपर्यंत प्लेसहोल्डर म्हणून एका मजेदार वेबसाइटचा वापर केला, परंतु कार्ड छापण्यापूर्वी ती ही यूआरएल काढून टाकण्यास विसरली. आरएसव्हीपी कार्डमध्ये असे लिहिले आहे: “लग्नाच्या अधिक तपशीलांसाठी, कृपया आमच्या वेबसाइट http://www.Pornhub.com ला भेट द्या.”

राधा-कृष्णाची आक्षेपार्ह पेंटिंग विकण्यावरून अ‍ॅमेझॉन वादाच्या भोवऱ्यात; ट्विटरवर #Boycott_Amazon होतंय ट्रेंड

URL of the PornHub website on wedding card
Photo : Social Media

त्यानंतर तिने चुकीची आमंत्रण पत्रिका पाठवल्याबद्दल तिच्या मित्र आणि कुटुंबीयांची, विशेषतः तिच्या आईची माफी मागितली. ती म्हणाली, “आई, मला माफ कर. मी ते दुरुस्त करेन.” ती पुढे म्हणाली, “मला वैयक्तिकरित्या हे मजेशीर वाटले. पण मला वाटत नाही की इतर कोणालाही ते मजेदार वाटेल, विशेषत: माझ्या आणि माझ्या पतीच्या कुटुंबियांना.” या व्यतिरिक्तही या आमंत्रण पत्रिकांमध्ये बऱ्याच चुका होत्या.