Viral video: गेल्या काही काळात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. गर्दीचा फायदा घेऊन काही चोर चोरी करतात. कितीही कारवाई केली तरी मात्र तरी देखील मोबाईल चोरीच्या घटना काही कमी झालेल्या नाहीत. मात्र हे चोर कितीही हुशार असले तरी पोलिसांसमोर यांचा जास्तवेळ निभाव काही लागत नाही. अशाच एका चोराला पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये पकडलं आहे. दबंग आणि सिंघम फिल्ममधील पोलिसाच्या स्टाईलचे तर तुम्ही दिवाने आहातच. अशाच एका पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अगदी दबंग, सिंघमप्रमाणेच या पोलिसानेही भारी काम केलं आहे. एका चोराचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्याला पकडलं आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत असून या पोलिसाची सर्वत्र चर्चा होते आहे.

अगदी सिनेमात दाखवतात तसा चोर-पोलिसांचा थरारक पाठलाग प्रत्यक्षात फार कमी वेळा पाहायला मिळतो. चोर-पोलिसात सिनेस्टाईल थरार रंगला. हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला, जो व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या पोलिसाचं कौतुक केलं जातं आहे.हे संपूर्ण दृश्य तिथं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एखाद्या फिल्मचा शूटिंग व्हिडीओ असावा असं वाटेल पण असं नाही. हा रिअल लाइफ सिंघमचा व्हिडीओ आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चोर पुढे धावत आहे तर त्याच्या मागे पोलीस धावत आहेत. पुढे एका पुलावर येताच हा चोर युक्ती वापरतो आणि पुलावरुन थेट खाली पाण्यात उडी मारतो. यावेळी त्याला वाटत पोलीस काही पाण्यात उडी मारणार नाहीत. मात्र पोलिसही दुसऱ्या क्षणाला त्याच्या मागे पाण्यात उडी मारतात. पोलीस पाण्यातही त्याचा पाठलाग करतात. आणि अखेर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल की नदीच्या काठावर पोलिसांचे एक पथक उभे होते आणि पाठूनही एक पोलिस चोराचा पाठलाग करत होता. चोर नदीतून बाहेर येताच पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >> तरुणाने चक्क मगरीच्या पिल्लाला Kiss केले आणि…; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “मूर्खासारखे…”

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोलिसाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.