कदाचित सगळ्यांना आश्चर्य वाटले पण नासाने १३ व्या राशीचा शोध लागला आहे असा दावा केला आहे. पहिल्यांदाच २ हजार वर्षानंतर १३ व्या राशीचा शोध आपण लावल्याचे नासाने म्हटले आहे. या नव्या राशिला ‘ऑपहिकस’ असे नाव देण्यात आले आहे. विशालकाय सापाला पकडणारा वृद्ध असे या राशीचे चिन्ह आहे. यावर्षाच्या सुरूवातीला नासाने ब्लॉग प्रकाशित केला होता. त्यात एकूण राशी बारा नसून त्या १३ राशी असल्याचे म्हटले होते. आता या नव्या ऑपहिकसबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
नासाने आपल्या ब्लॉगमध्ये एकूण १३ राशी असल्याचे म्हटले होते. तीन हजार वर्षांपूर्वी बेबेलॉन लोकांनी राशींची १२ भागांत विभागणी केली त्यामुळे वर्षांच्या १२ महिन्याला एक एक रास विभागून दिली. पण त्यांच्या दिनदर्शिकेत वर्ष हे बारा महिन्यांचे होते त्यामुळे १३ व्या राशीला कसे विभागायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे आपसूकच समान विभागणीच्या वेळी ही १३ वी रास बाहेर फेकली गेली आणि कालांतराने या राशीबद्दल जगाला विसर पडला.
बेबेलॉन लोकांच्या प्राचीन कथेत देखील तेराव्या राशीचा उल्लेख आहे असाही गौप्यस्फोट नासाच्या ब्लॉगमधून करण्यात आला. त्यामुळेच कदाचित याचमुळे बरेचदा राशिचे भविष्य वर्तवले तरी ते चुकीचे ठरत असेल असा अंदाजा त्यांनी बांधला आहे. इतकेच नाही तर २०११ मध्ये पहिल्यांदा तेरावी रास असल्याचे समोर आले होते पण लोक यावर वादविवाद करत असल्याचे यात म्हटले. २९ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या काळात जन्माला आलेल्यांची ही नवीन रास असू शकते असेही यात सांगण्यात आले आहे.
[jwplayer EztVJWax]