मोठमोठ्या शहरांमध्ये पहाटे उठल्यापासून किती धावपळ केली जाते, हे तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. मुलांना शाळेत पाठवण्यापासून ऑफिसला जाईपर्यंत अनेक कामं घाई गडबडीत करावी लागतात. घरातून बाहेर पडलं की, लोकल, मेट्रोमधील प्रवाशांची गर्दी तर रस्त्यावरची वाहतूक कोंडी, हेच सर्व शहरातील सकाळी उठल्यानंतरचे चित्र असते. त्यामुळे शहरांमध्ये लोकांना मनमोकळा श्वास घेणंही कठीण झालं आहे. शिवाय मोठमोठ्या इमारतींमुळे पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही आणि थंडगार वाऱ्याची झुळूकही, त्यामुळे अनेकांचे मन शहरांमध्ये रमत नाही. विशेषत: जे लोकं गावाकडून शहरांमध्ये कामानिमित्त येतात, ते शरीराने शहरात आणि मनाने गावाकडे असतात.

तर शहरात शांतता कमी आणि संघर्ष जास्त आहे असंही अनेकांच म्हणणं असतं, शिवाय शहरातील अनेकांची नजर निसर्गापासून दूर आणि मोबाईलमध्ये जास्त असते. त्यामुळे या शहरी जीवनाला कंटाळेल्या अनेकांसाठी गावाकडची आठवण मनाला सुखावणारी असते. गावाकडची ओढ असणाऱ्या लोकांसाठी असाच सुखद धक्का देणारे आणि त्यांना आवडतील असे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये गावाकडील मनमोहक क्षण कॅमेऱ्याद कैद केले आहेत. जे पाहून तुम्हालाही नक्कीच समाधान मिळू शकेल यात शंका नाही.

हेही पाहा- “तुला बॉयफ्रेंड नव्हे गुलाम पाहिजे…” ब्रेकअप करताना तरुणाने प्रेयसीला पाठवला ‘असा’ व्हॉइस मेसेज, ऐकून पोट धरुन हसाल

सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होणाऱ्या या गावाकडील मनमोहक दृश्याचा व्हिडिओ @yashchoudhary04 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हे व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “गावाकडील पहाटेची दृश्य” हे व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलेच भावल्याचं दिसत आहेत. कारण आतापर्यंत ते ५ कोटींहून अधिक लोकांनी पाहिले आहेत तर ५८ लाख लोकांनी के लाईक केले आहेत. तर हजारो लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमेंट बॉक्समध्ये अनेक नेटकऱ्यांनी, “मला माझ्या गावाचा अभिमान आहे” असं लिहिलं आहे. तर काहींनी हे व्हिडीओ पाहून बालपणीचे दिवस आठवल्याचं म्हटलं आहे. हे व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या युजरने राजस्थानमधील अनेक दृश्य व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहेत. या अकाऊंटवर गावाशी संबंधित अनेक व्हिडिओ पोस्ट केल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये गावाकडची पहाट, गावातील रस्ते आणि शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरील भावना कॅमेऱ्यात कैद केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे व्हिडीओ पाहताच लोकांच्या मनात गावाकडील आठवणी जाग्या होत आहेत. त्यामुळे लोक हे व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत असून त्यावर चांगल्या प्रतिक्रीया देत असल्याचंही पाहायला मिळत आहे.