प्राण्यांच्या त्वचेपासून माणसांसाठी खूप उपयुक्त अशा अनेक प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात हे तर तुम्हाला माहीत आहे. पण, प्राण्यांच्या शिंगांपासूनही बऱ्याच वस्तू बनवल्या जातात हे तुम्हाला माहीत आहे का? नाही! मग तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, प्राण्यांच्या शिंगांचा उपयोग करून भांडी बनवली जात आहेत. सोशल मीडियावर यासंबंधीच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका युजरने प्राण्यांच्या शिंगांपासून कशा प्रकारे भांडी बनवली जातात याची झलक दाखवली आहे.

सगळ्यात पहिल्यांदा एक कामगार कारखान्यात मृत जनावरांची शिंगे घेऊन येतो. त्यानंतर यंत्रांच्या साह्याने या शिंगांना आकार देण्यात येतो. वेगवेगळ्या भांड्यांचा आकार देण्यासाठी ही शिंगे वेगवेगळ्या आकारात कापली जातात. त्यानंतर या शिंगांमधील हाडे बाहेर काढून, ही शिंगे घासून घेतली जातात. कारण- त्यामुळेच शिंगांपासून बनवलेली भांडी आकर्षित दिसतात. कशा प्रकारे प्राण्यांच्या शिंगांपासून भांडी, शोभेच्या वस्तू तयार केल्या जात आहेत ते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…VIDEO : किती तो निरागसपणा! आरशात पाहून स्वत:वरच भुंकत होता कुत्रा, पाहा मजेशीर व्हिडीओ

व्हिडीओ नक्की बघा :

एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मृत जनावरांची शिंगे कारखान्यात आणून, त्यांची भांडी तयार केली जात आहेत. भांड्यांव्यतिरिक्त या मृत जनावरांच्या शिंगांचा वापर घरातील शोभेच्या वस्तू बनवण्यासाठीही केला जातो आहे. तसेच या शिंगांना वस्तूंचा आकार देण्यासाठी त्यांना आगीवर शेकवून घेऊन दुमडून घेतले जात आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी लाकडाचा वर्तुळाकार तुकडा घेऊन या तयार केलेल्या वस्तूंच्या खाली गमने चिटकवून घेण्यात आला आहे; जेणेकरून हे भांडे अगदीच आकर्षक दिसू लागेल आणि पुन्हा एकदा यंत्राद्वारे त्यावर फिनिशिंग करण्यात आली आहे.

अशा प्रकारे कारखान्यात मृत प्राण्यांच्या शिंगांपासून शोभेच्या वस्तू आणि भांडी तयार केली जात आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Thefoodiehat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरचे नाव अभिषेक; तर व्हिडीओत माहिती सांगणाऱ्या तरुणीचे नाव कोमल आहे आणि हे दोघे डिजिटल क्रिएटर आहेत.