Shocking video: रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना नेहमी सावध राहण्याचे आवाहन केले जाते. अनेकवेळा थोड्याशा निष्काळजीपणामुळेही मोठे नुकसान होते. रेल्वेत अनेक टवाळ, चोर, दरोडेखोर लुटण्याच्या इराद्याने ट्रेनमध्ये असतात आणि संधी शोधत असतात. सध्या सोशल मीडियावर एका घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सतर्क व्हाल. भारतीय रेल्वेच्या प्रवाशांबरोबर अनेकदा काही ना काही आश्चर्यकारक घटना घडत असतात, यात काही क्षणात व्हायरल होतात. अशाच एका साखळी चोराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या चोरानं धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेची चैन चोरी करुन धावत्या ट्रेनमधून उडी मारली. या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ट्रेन संथ गतीने जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचवेळी एक व्यक्ती रेल्वे गेटजवळ बाथरूमच्या दिशेने उभी आहे. ही व्यक्ती सामान्य प्रवाशासारखी दिसते. पण काही वेळाने तो अशा हालचाली करू लागतो ज्याची त्याच्या आजूबाजूचे लोक कल्पनाही करू शकत नाहीत. व्हिडिओमध्ये दोन महिला बाथरूममधून बाहेर पडताना दिसत आहेत. त्या निघून गेल्यावर हा चोर अचानक त्यांच्या दिशेने धावतो आणि गळ्यातली साखळी घेऊन ट्रेनमधून उडी मारते. हा लाइव्ह व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. त्यामुळे सोनसाखळी चोरांपासून सतर्क राहण्याचं पोलिसांनी आवाहन केलंय. त्यामुळं अशा सोनसाखळी चोरांपासून सावधगिरी बाळगा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> वाटेत मृत्यूनं गाठलं! बाईक चालकावर अचानक छत कोसळलं अन्…थरकाप उडवणारा Video पाहाच

आतापर्यंत २.५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ @rnsaai नावाच्या युजरने एक्सवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अडीच लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने लिहिले की, धक्कादायक व्हिडिओ. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे.” याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.