Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोर भलेही चोरी करताना हुशारी दाखवतात, पण कधी कधी एक चूक त्यांना महागात पडते. चोर तुमच्या समोरून चोरी करून जाऊ शकतात, पण प्रत्येकवेळी त्यांना यात यश मिळेलच असं नाही. चोरांचे चोरी करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत एक चोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करतो आणि घरातच अडकतो. दरम्यान कुटुंब पुन्हा घरी आल्यावर जे होतं ते पाहून तुम्हालाही धडकी भरेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरात कुटुंब बाहेर गेलेलं असताना चोरी झाली आहे. यावेळी जेव्हा घरातले पुन्हा घरी येतात तेव्हा त्यांना कळतं की घरात चोरी झाली आहे. यावेळी सर्वजन घरात काय काय चोरी झाली आहे हे बघण्यासाठी संपूर्ण घर तपासतात आणि तेव्हाच त्यांना धक्का बसतो. चोरानं घरात सर्व सामान इकडे तिकडे केलेलं आहे, अशावेळी घरात कुणीतरी असल्याचा त्यांना भास होतो. मग घरातले दोन तरुण शोधण्यासाठी जातात आणि चोराला पाहून त्यांनाही धक्का बसतो. यावेळी चोरही त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे येताना दिसत आहे मात्र या तरुणांनी त्याला पकडून मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे यापुढे घर बंद करुन बाहेर जाताना सावधान राहा.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया यूजर्स पोट धरून हसत आहेत. अनेक यूजर्स हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते की, पुढे काय झालं. एका यूजरने लिहिलं की, ‘मला वाटतं तो अजूनही तिथेच असेल प्लिज पार्ट टू दाखवा’. तेच एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, ‘वेलकम’ सिनेमात एक डायलॉग आहे ”ये राज भी उसी की साथ चला गया.’