Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तहानलेल्या सापाला एक सर्पमित्र पाणी पाजताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
साप हा शब्द जरी कानावर पडला तरी अंगावर काटा येतो. या व्हिडीओमध्ये हा सर्पमित्र चक्क सापाला पाणी पाजताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही. काही लोक पहिल्यांदा तहानलेला साप बघतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सर्पमित्राने सापाला बाटलीने पाजले पाणी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक सर्पमित्र तहानलेल्या सापाला पाणी पाजताना दिसत आहे. हा सर्पमित्र चक्क बाटलीने पाणी पाजत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की साप सुद्धा लक्ष केंद्रित करून पाणी पित आहे. यावरून तुम्हाला कळेल की सापाला खरोखर तहान लागली आहे. काही लोक बाटलीने पाणी पिणाऱ्या सापाचा व्हिडीओ पहिल्यांदा पाहत असतील. व्हिडीओ पाहून काही लोक अवाक् होतील.

हेही वाचा : रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Fact Check : प्रचारादरम्यान भाजपा नेत्यावर हल्ला? VIDEO होतोय व्हायरल, जाणून घ्या नेमकं खरं काय…

anahata_mama या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सर्पमित्राला @sahabatalamreal टॅग सुद्धा केले आहे.त्याने त्याच्या या अकाउंटवर सापाबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत.
या व्हिडीओवर १८ लाखपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ लाइक केला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मनाला शांतता मिळाली.” तर एका युजरने लिहिलेय, “अखेर सापाला प्रेम मिळतय” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला साप कधीच आवडले नाही. साप ज्याप्रकारे पाणी पित आहे, ते पाहून मला खूप रडू आले. त्याचे डोळे किती निर्मळ आहे.”