‘या’ कलाकाराने एकाच वेळी बनवले सहा पोट्रेट; Viral Video पाहून नेटकरी थक्क

टाइम-लॅप्सचे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि लोकांनी अमेडोच्या विलक्षण टॅलेंटचे कौतुक केले आहे.

artist created six portraits at once
अप्रतिम कलाकृतीचा नमुना (फोटो: @amed0_/Twitter)

कलाकार हे अप्रतिम कलाकृती बनवण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या टॅलेंटची प्रशंसा केली जाते. अमेडो नावाच्या एका लिबियन कलाकाराने आता एकाच वेळी सहा पोर्ट्रेट बनवून लोकांना थक्क केले आहे. गुरुवारी, अॅमेडोने एक टाइम-लॅप्स व्हिडीओ पोस्ट केला ज्यामध्ये तो आपले हात आणि पाय एकाच वेळी दोन्ही वापरून पोर्ट्रेट बनवताना दिसतो.

अप्रतिम कलाकारीचा व्हिडीओ

३८ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये, कलाकार एक अद्वितीय उपकरण वापरतो ज्यामुळे त्याला चार स्केच पेन एकाच वेळी धरता येतात आणि चार वेगवेगळ्या शीटवर चित्र काढता येते. “शेवटच्या प्रयोगाच्या ८ दिवसांनंतरच्या अयशस्वी प्रयत्नांनी भरलेले होते, शेवटी मला यश मिळाले. आणि हा त्याचा परिणाम आहे. आशा आहे की तुम्हाला आनंद होईल” असं व्हिडीओला कॅअरबीमधून कॅप्शन दिलं आहे.

(हे ही वाचा: सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)

लिबियातील वैद्यकशास्त्राचे विद्यार्थ्याने १२ जानेवारी रोजी आठ दिवसांपूर्वी एकाच वेळी चार पोर्ट्रेट बनवण्याच्या या प्रयत्नाचा संदर्भ दिला. त्यानंतर त्याने एकाच वेळी सहा पोर्ट्रेट बनवण्याच्या आणखी वेगळ्या कामाला आव्हान दिले आणि तो यशस्वी झाला.

(हे ही वाचा: Viral Photo: ४ की ६? फोटोमध्ये नक्की किती हत्ती आहेत?)

व्हिडीओ व्हायरल

टाइम-लॅप्सचे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि लोकांनी अमेडोच्या विलक्षण टॅलेंटचे कौतुक केले आहे. एका व्यक्तीने टिप्पणी केली, “अरे. आश्चर्याच्या पलीकडे. असे कौशल्य आणि टॅलेंटअसलेली जगात दुसरी कोणती व्यक्ती आहे का?”, तर दुसरा म्हणाला, “तुम्ही तुमच्या डोक्याला असे काहीतरी कसे प्रशिक्षित करता? हे आश्चर्यकारक आहे.”

(हे ही वाचा: डोळ्यावर पट्टी बांधून व्यक्तीने बनवले नूडल्स; Video पाहून नेटीझन्स झाले थक्क)

(हे ही वाचा: स्टंट करण्याच्या नादात तरुणीने कॅमेरामॅनवरच चढवली स्कूटी; Video Viral)

अल बवाबा वेबसाइटशी संभाषणात, तरुण कलाकाराने सांगितले की त्याने २०१८ मध्ये कलेचा सराव सुरू केला आणि एक यशस्वी आंतरराष्ट्रीय कलाकार बनण्याची त्याची इच्छा आहे. त्याने हे देखील उघड केले की एकाच वेळी अनेक पोर्ट्रेट बनवण्यासाठी त्याला आठवड्यांचा सराव लागतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This artist created six portraits at once netiznes shocked to see viral video ttg

Next Story
VIDEO : ५ षटकार अन् ९ चौकार..! २००च्या स्ट्राइक रेटनं घोगावलं युसुफ पठाणचं वादळ; भारताला मिळवून दिला विजय!
फोटो गॅलरी