भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. त्यानुसार प्रत्येकाची वेगवेगळ्या देवांवर श्रद्धा आहे. कोणी दगडात देव शोधतो, तर कोणी एखाद्या झाड किंवा प्राण्यासमोर डोकं टेकतात. पण, तुम्हाला एकून आश्चर्य वाटेल की राजस्थानमध्ये असे एक मंदिर आहे जिथे लोक कुठल्या मुर्तीची नाही, तर चक्क बुलेटची पूजा केली जाते. तसेच दुचाकीची पूजा केल्याने ते सुरक्षीत राहतात असंही ते मानतात. हे मंदीर राजस्थानमधील जोधपूरपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर जोधपूर-पाली हायवेजवळ चोटीला नावाच्या गावात आहे, जिथे बुलेटचे बाबा ओम बन्ना बसलेले आहेत. हे मंदिर ओम बन्ना तीर्थ म्हणूनही ओळखले जाते. बरेच लोक श्रद्धा नाही तर हे विचित्र मंदिर बघायला येतात.

लोकं का करतात बुलेटची पूजा?

चला तर जाणून घेऊयात या बाईकमध्ये असं काय आहे आणि त्यामागची कथा काय आहे, ज्यामुळे लोक बऱ्याच वर्षांपासून या जुन्या बाईकमध्ये देव शोधत आहेत. हे मंदिर केवळ राजस्थानच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात प्रसिद्ध आहे. भाविक येथे मोठ्या संख्येने येतात, पूजा करतात, आरती करतात आणि आपल्या इच्छा व्यक्त करतात. चला जाणून घेऊया दुचाकी पूजेची कथा आणि ही बाईक कोणाची आहे.

काय आहे बुलेट मंदिरामागची कथा

हे बुलेट मंदीर राजस्थानमधील चोटीला गावात सुमारे ३० वर्षांपूर्वी रस्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ठाकूर जोगसिंग राठोड यांचा मुलगा ओम सिंह राठोड यांच्या नावाने बांधण्यात आले आहे. १९८८ मध्ये पाली येथील रहिवासी ओम बन्ना त्यांच्या बुलेटवरुन जात असताना त्यांचा अपघात झाला आणि वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ही दुचाकी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली, पण ही दुचाकी तेथून गायब झाली. यानंतर ती बुलेट दुर्घटनास्थळी सापडली, जिथे ओम बन्नांचा अपघात झाला होता. त्यानंतर पुन्हा ती पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली आणि पुन्हा ही बुलेट त्याच ठिकाणी परत आली. असं बर्‍याचदा घडलं. असं म्हटलं जातं की पोलिसांनी दुचाकीला साखळीनेही बांधून ठेवलं होतं, पण तरीही दुचाकी पोलीस स्टेशनमधून गायब झाली. यानंतर, हा एक चमत्कार मानला गेला आणि त्याच ठिकाणी ती बाइक स्थापित करण्यात आली. यानंतर लोकांनी त्याची पूजा करण्यास सुरुवात केली आणि लोकांचा विश्वास वाढत गेला. यानंतर, लोकांची अशी मान्यता आहे की ओम बन्ना आणि दुचाकी त्यांचे संरक्षण करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

हेही वाचा >> VIDEO: किल्ले प्रतापगडावर आभाळमाया; सूर्योदय होताना आकाशात भगव्या रंगाची उधळण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही कधी या ठिकाणी गेलात तर या घटनेशी संबंधित अनेक चमत्कारिक कथा ऐकायला मिळतील.जेव्हापासून येथे हे बाईकचे मंदिर बांधले गेले, तेव्हापासून येथे अपघात झालेला नाही. अनेक भाविक देशातील वेगवेगळ्या भागातून येथे पूजा करण्यासाठी येतात. राजस्थानमध्ये आता एक मोठा वर्ग ओम बन्नाची पूजा करतो आणि त्यांची आरती करतात.