पृथ्वीवर अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत आणि पण अजूनही काही प्रजाती जीवंत आहे ज्या पृथ्वीवरून नामशेष होण्याचा धोका आहे. हे टाळण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. नामशेष होण्याचा धोका असलेल्या या प्रजातींचे संरक्षण करण्याच्या प्रयत्न करत आहे. त्यांच्यासाठी आवश्यक असलेले जंगल आणि नैसर्गिक अधिवास जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच याबाबत जनजागृती करत आहे. पण दुसरीकडे काही लोक या प्रयत्नावर पाणी फिरवत आहे. नुकताच असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे ज्यामुळे पृथ्वीवरून नामशेष होत असलेल्या ऑरंगुटानचा (माकडाची प्रजाती) जीव धोक्यात टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
क्रिमियातील सफारी पार्कमध्ये डाना नावाच्या पृथ्वीवरून नामशेष होत असलेल्या ऑरंगुटानला (माकडाची प्रजाती) व्हेप (ई-सिगारेटचा प्रकार) दिल्याबद्दल रशियन बॉक्सर अनास्तासिया लुचकिना (Anastasia Luchkina)हिला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागत आहे. हा भयानक फुटेज इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये हे माकड अनेक वेळा व्हेप वापरून धूर बाहेर फुंकत असल्याचे दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, २४ वर्षीय अनास्तासिया लुचकिना ही व्हेप (ई-सिगारेट) ओढताना दिसत आहे. नंतर तरी पिंजऱ्यात असलेल्या माकडाला देखील तो व्हेप देते. ते माकड देखील तिचे अनुकरन करत व्हेप ओढतो आणि तोंडातून धूर बाहेर सोडतो. एकदा नव्हे तो दोन-चार वेळा व्हेप ओढतो अन् धूर बाहेर सोडतो या व्हिडिओमुळे लुचकिना यांच्यावर टीका झाली आहे आणि प्राण्याच्या जीवाला धोका देऊ चिंता व्यक्त केली जात आहे.
व्हिडिओ एक्सवर @CollinRugg नावाच्या खात्यावरून पोस्ट केला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की,”हे भयानक आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “यापेक्षा वाईट काय आहे? एखाद्या वन्य प्राण्याला पिंजऱ्यात ठेवणे जेणेकरून लोक त्याच्याकडे पाहू शकतील किंवा एखाद्या वन्य प्राण्याला व्हेप वापरण्यासाठी देणे?” तिसऱ्याने लिहिले की, “हा प्राण्यांवरील अत्याचार आहे. त्याते कोणत्याही प्रकारे समर्थन करू नये.”
माकडाच्या आरोग्यावर झाला परिणाम
रशियन आउटलेट, Zamin.uz च्या वृत्तानुसार, दानाची भूक कमी झाली आहे, ती लोकांशी संवाद साधण्यास नकार देते आणि तिचा दिवसाचा बराचसा वेळ तो निश्चल पडून राहते, ज्यामुळे तिला गंभीर आरोग्य समस्या असल्याचे दिसून येते. पशुवैद्यांना संशय आहे की,”तिने व्हेपमधून निकोटीन कार्ट्रिज गिळले असावे, ज्यामुळे गंभीर नशा होऊ शकते.”
सफारी पार्कचे पशुवैद्य, वसिली पिस्कोवॉय यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की,”दानाने (माकड) व्हेपची कॅप गिळली असेल असे वाटत आहे कारण या प्लास्टिकमुळे आतड्यांमध्ये अडथळा आणि उलट्या होऊ शकतात. आधीच ती नीट खात नाही आता तिला आणखी अस्वस्थता जाणवत आहे आणि ती दिवसभर झोपत आहे. जर आतड्यांमध्ये अडथळा आला तर सर्व जबाबदारी या मुलीच्या खांद्यावर येईल. दानोचका (माकड) लहान मुलासारखे आहे. ती सर्व काही आपल्या तोंडात घालेल आणि देव करो, तिने ते गिळलेले नसावे. हे खूप धोकादायक आहे. धूम्रपान करणे वाईट असले तरी तेकेले हे इतके धोकादायक नाही जितके व्हेपची कॅप गिळणे धोकादायक आहे. असे झाले तर दानावर शस्त्रक्रिया करावी लागेल.”
लुचकिनाला ठोठावण्यात आला दंड
दुसरीकडे, लुचकिनाला दंड ठोठावण्यात आला असून आणि पार्कमध्ये जाण्यासर बंदी घातली आहे. बॉक्सरचे प्रशिक्षक व्लादिमीर अकाटोव्ह यांनी रशियन पत्रकारांना सांगितले की, “मला माहित नव्हते की अनास्तासिया धूम्रपान करते. ती सध्या सुट्टीवर आहे. ती परतल्यावर आम्ही निश्चितपणे या विषयावर चर्चा करू.”