मागील काही दिवसांपासून कुत्र्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देशातील अनेक ठिकाणी लहान मुले, वयोवृद्ध तसेच डिलिव्हरी बॉयवरही कुत्र्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यानंतर कुत्र्यांप्रती लोकांमध्ये दहशत पसरली आहे. मात्र नुकताच एक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही राग अनावर होईल. या व्हिडीओमध्ये एक इसम कुत्र्याला दोरीने बांधून कारसोबत पळवत असल्याचे आपण पाहू शकतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होणारा व्हिडीओ जोधपूर येथील असून या व्हिडीओमधील कारच्या मागे धावणारा कुत्रा फारच थकलेला आहे. कार चालवणाऱ्या इसमाचे नाव डॉ. रजनीश गलवा असे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका दोरीच्या साहाय्याने या कुत्र्याला चालत्या कारला बांधण्यात आले असून धावून-धावून हा कुत्रा फारच दमला आहे. तो दोरीमधून सुटण्याच्या प्रयत्नात आहे.

Video : पोलिसांनी तपासणीसाठी आणलेल्या श्वानाशी राज ठाकरेंची गट्टी, पोलिसांनाच म्हणाले “काय रे याचे लाड…”

हा व्हिडीओ पाहिल्यावर प्रत्येकालाच वाईट वाटले आहे. नेटकरी कार चालकावर टीका करत आपला संताप व्यक्त करत आहेत. एका युजरने म्हटलंय, ‘कार चालवणारा ‘जनावर’ किती असंवेदनशील आहे.’ दरम्यान, कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने असे कृत्य का केले याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

Video : नारळाच्या झाडावर दोन बिबटे आपापसातच भिडले; थरारक घटना कॅमेरामध्ये कैद

मिळालेल्या माहितीनुसार, कार चालक डॉ. रजनीश गलवा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला असून नेटकऱ्यांचा राग अनावर झाला आहे.