५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे आता भ्रष्टाचा-यांनी लपवलेला काळा पैसा या ना त्या मार्गाने समोर येत आहेत. या निर्णयानंतर पुण्यात  एका महिला सफाई कामगाराला कच-यात रोख ५२ हजार रुपये सापडले. गंगेच्या पात्रातही ५०० आणि १००० च्या नोटा आढळल्यात. कोलकातामध्ये देखील एका गाडीत ५०० आणि १००० च्या नोटांचे तुकडे सापडलेत. तर मुंबईतही एकाने या नोटांना आग लावल्याची बातमी वा-यासारखी पसरली. गेल्या आठवड्याभरात अशा अनेक बातम्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅपच्या मार्फत प्रत्येकाकडे फिरत आहेत असे असतानाच राजस्थानमधल्या एका व्यवसायिकाकडे तब्बल १३ कोटींचा काळा पैसा सापडला आहे अशी बातमीही व्हायरल झाली. ५०० आणि १००० च्या नोटांचे बंडल रचून ठेवलेली अनेक छायाचित्रे देखील सोशल मीडियावर फिरत आहेत. मोदींच्या निर्णयामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काळे धन समोर आले अशी चर्चा रंगली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही छायाचित्रे आठवड्याभरातील नसून ती वर्षभरापूर्वींची आहे असे समोर आले आहे, राजस्थानमधल्या एका बड्या मार्बल व्यापा-याकडून ही रक्कम आयकर विभागाने वर्षभरापूर्वी जप्त केली होती. हे तेव्हाचे फोटो आहे. राजस्थानमधल्या आर. के. मार्बल कंपनीच्या देशात २९ ठिकाणी शाखा आहेत. आयकर विभागाने वर्षभरापूर्वी देशभरातील या कंपनीच्या विविध शाखांवर छापे मारले होते आणि त्यातून ही १३ कोटींची रोकड जप्त केली होती. गेल्याचवर्षी सप्टेंबरमध्ये हे छापे घालण्यात आले होते. पण मोदींच्या निर्णयाची या फोटोंशी सांगड घालून  काळे धन बाहेर आले असल्याचे सांगत ते  व्हायरल करण्यात आले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is the truth behind viral photo of black money
First published on: 15-11-2016 at 11:38 IST