Rajasthan Road Accident Video: सोशल मीडियावर तुम्ही अनेक अपघाताचे व्हिडीओ देखील पाहिले असेल. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ थक्क करणारा. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. असाच एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात राजस्थानच्या सवाई माधोपूर रोड येथे झाला आहे. हा अपघात इतका भिषण होती की यामध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की गाडी चालवताना सतर्क राहणं किती महत्त्वाचं आहे.

रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

तीन विवाहित जोडप्यांचा एकत्र मृत्यू

राजस्थानमधील दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर रविवारी यू-टर्न घेत असलेल्या ट्रकला धडकून कारने प्रवास करत असलेल्या एका कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. एक्स्प्रेसवेच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, मागून येत असताना ट्रक चालकाने चुकीचा यू-टर्न घेतल्याने हा अपघात घडला आणि कार पुढे जाऊन आदळली. या व्हिडिओमध्ये एक्स्प्रेसवेवर झालेला हा रस्ता अपघात स्पष्टपणे दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ट्रक चालकाचा निष्काळजीपणाही स्पष्ट दिसून येतो. व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता, एका कार सामान्य स्पीडमध्ये महामार्गावर प्रवास करत आहे. अचानक समोर उभा असलेला एक मिनी ट्रक यू-टर्न घ्याचा प्रयत्न करू लागतो. ट्रक वळतो इतक्यात मागून येणारी ही कार त्याला धडकते. या अपघातात तीन विवाहित जोडप्यांचा एकत्र मृत्यू झाला होता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?

आरोपी चालक फरार

पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असला तरी चालक फरार आहे.राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला, जेव्हा कुटुंब सीकर जिल्ह्यातून रणथंबोरच्या त्रिनेत्र गणेश मंदिराकडे जात होते.मनीष शर्मा, त्याची पत्नी अनिता शर्मा, सतीश शर्मा, पूनम, त्याची मावशी संतोष आणि त्याचा मित्र कैलाश अशी मृतांची नावे आहेत. तर मनन आणि दीपाली ही दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही यावेळी शोक व्यक्त केला.

“दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर सवाई माधोपूर जिल्ह्यातील बाउली पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातात ६ नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. संबंधित बाधितांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोक,” असे ट्विट त्यांनी केले आहे.