Viral Video : उखाणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. विवाहित स्त्री किंवा पुरुष त्यांच्या जोडीदाराचे लयबद्ध पद्धतीने नाव घेतात, यालाच उखाणा म्हणतात. मंगलकार्य असो किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी पुरुष किंवा स्त्री जोडीदाराचे नाव घेत आवडीने उखाणा घेतात. पूर्वी फक्त स्त्रिया नवऱ्याचे नाव घेत उखाणा घ्यायच्या आता पुरुष मंडळी सुद्धा तितक्याच उत्साहाने उखाणा घेताना दिसतात. सोशल मीडियावर उखाण्याचे तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असेल. कधी महिला तर कधी पुरुष मंडळी उखाणा घेतात पण तुम्ही कधी विचार केला का की सिंगल मुली कसा उखाणा घेईल? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सिंगल मुलगी भन्नाट उखाणा घेताना दिसते. (amazing ukhane for signle girls viral video)

सिंगल मुलींसाठी उखाणे

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी सिंगल असताना भन्नाट उखाणा घेताना दिसत आहे. उखाणे खालीलप्रमाणे –

१. चांदीच्या वाटीत मटणाचे तुकडे, संसार करण्याच्या वयात बोंब लागली इकडे
२. ऑफिसला जाताना करते लोकलची वारी, रावांच्या एक्सपेक्षा मीच होते बरी
३. मोनालिसाच्या चित्रातील रंग भिन्न आणि गडध, आमच्या रावांचे नाव घेते सॅलरीची आठवण काढत
४. पिवळ्या पिवळ्या हरणाचे वाकडे तिकडे पाय, उखाणा घ्यायला अजुन मुलगाच मिळाला नाय

हे उखाणे ऐकून तुम्हालाही पोट धरून हसायला येईल. सिंगल मुलींना कदाचित हे उखाणे आवडू शकतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Kolhapur Video : कोल्हापूर शहराचे जुने फोटो अन् असंख्य आठवणी, VIDEO पाहून आठवेल जुने दिवस

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : विद्यार्थी जोमात, शिक्षक कोमात! पाचवीतल्या विद्यार्थ्याने लिहिलं हटके उत्तर; उत्तरपत्रिका वाचून येईल हसू

utsavii_p या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मी तुला समजू शकते ताई” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना या तरुणीचे उखाणे आवडले आहे. काहींना शेवटचा उखाणा खूप आवडला. काही युजर्सनी तर कमेंट बॉक्समध्ये भन्नाट उखाणे सुद्धा लिहिलेय, एका युजरने लिहिलेय, “इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, राव दिसेना झालेत खड्यात पडले की काय” तर एका युजरने लिहिलेय, “कोपऱ्यात ठेवले होते गहू, लग्नच नाही झाले तर नाव कोणाचे घेऊ?”