Truck pati Viral video: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन लय हिट हायत भाऊ. त्यात सातारा सांगली भागातल्या ट्रकच्या मागच्या पाट्या तर प्रचंड व्हायरल होतात. ‘मेरा भारत महान’ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की “जेव्हा घरची जबाबदारी खांद्यावर येते ना…” “मी पण अशा व्यक्तीवर प्रेम केलं…” दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान साताऱ्यातील एका ट्रकमागची पाटी सध्या तुफान व्हायरल होत आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर फिरत आहे.

आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. आपण सगळेच आपल्या आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. कधी कधी कोणत्या शाळेतले धडे नाही तर आयुष्यात आलेली परिस्थितीतीही खूप काही शिकवून जाते. कधी कधी कोणत्या मोटिवेशनची गरज नसते तर आई-वडिलांचे कष्ट, हालाकीची परिस्थिती तर कधी झालेला अपमानही आपल्याला योग्य मार्गावर जायला भाग पाडतो. आई-वडिलांचे कष्ट हीच प्रेरणा बनून जाते आणि त्यातूनच आपण प्रगतीच्या मार्गावर जातो. दरम्यान ट्रकच्या मागच्या पाटीवर लिहलेलं वाक्यही असंच आहे. हे वाचून तुम्हीही त्याच्याशी सहमत व्हा.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या ट्रकच्या मागे लिहलं आहे की, “वडिलांचं कष्ट डोळ्यासमोर असले की कोणत्याच प्रेरणादायी विचारांची गरज पडत नाही.” तसेच व्हिडीओ शेअर करताना युजरने व्हिडीओवरही, बाप बापच असतो..आज प्रवासादरम्यान एक टॅम्पो दिसला आणि त्या टेम्पोच्या पाठीमागे लिहीलेलं हे सुंदर आणि सत्य असे वाक्य…” हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तिची चूक नसेलही, पण कुत्र्यानं तिला क्षणात ओरबाडलं; लिफ्टमधला थरारक VIDEO व्हायरल

रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावरील एका ट्रकच्या मागची अशीच एक पाटी व्हायरल होत आहे जी पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

हा व्हिडिओ psi_ankushkarche_patil नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय.