सोशल मीडियावर देसी जुगाडचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. भारतातील लोक जुगाडमध्ये अत्यंत निष्णात मानले जातात. भारतीयांबद्दल असेही म्हटले जाते की, भारतातील लोकांपेक्षा जगात कोणीच जुगाडू नाही. सध्या एका भारतीय माणसाच्या जुगाडचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. एक प्रकारे या माणसाने जगातील सर्वात मोठा चमत्कारच करून दाखवला आहे.
या व्यक्तीने चक्क रेल्वे रुळावरच ट्रॅक्टर चालवून दाखवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आतापर्यंत तुम्ही रेल्वेच्या रुळांवरून फक्त ट्रेन धावताना पाहिल्या असतील. पण हा ट्रॅक्टर रुळावरून कसा चालला असेल याचाच विचार लोक करत आहेत.
व्हिडीओमध्ये एक ट्रॅक्टर रेल्वे रुळावर धावत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला ट्रॅक्टरच्या मधोमधून ट्रॅक्टर जात असावा असे वाटत असले तरी पुढच्याच सेकंदात ट्रॅक्टर प्रत्यक्षात रुळावरून धावत असल्याचे समजते. ट्रॅक्टरसोबत एक ट्रॉलीही जोडलेली दिसते. त्यात दगड दिसत आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की ट्रॅक्टरची चाके लोखंडी रुळावर कशी चालली असतील.
अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल
वास्तविक, या व्यक्तीने ट्रॅक्टरमध्ये सामान्य चाकांच्या जागी रेल्वेची चाके बसवली आहेत. याच कारणामुळे ट्रॅक्टर रेल्वे रुळावर जाण्यात यशस्वी ठरला आहे. akshatkumar1601 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लोकांची खूप पसंती मिळत आहे.