Weird Food Combination: Yuck! कांदा, बटाटा, मिरची नव्हे तर ओरिओ बिस्कीटची भजी; Viral Video पाहून लोक हैराण

नव्या विचित्र फूड कॉम्बिनेशनची डिश समोर येत आहे. या ही डीश एका भजीची असून ती कांदा, बटाटा, मिरची नव्हे तर ओरिओ बिस्कीटची आहे. हो तुम्ही बरोबर वाचलं आहे. पण हां या डिश चा व्हिडीओ सोशल मिडीयावर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. विश्वास नसेल होत तर हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

oreo-pakoda-Weird-Food-Combination
(Photo: Youtube/ Foodie Incarnate)

काही लोक अगदी फूड कॉम्बिनेशनमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात हूशार असतात. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर खाण्यापिण्याचे विचित्र फूड कॉम्बिनेशन व्हायरल होत असल्याचं दिसून येतंय. अशीच एक विचित्र फूड कॉम्बिनेशनची डिश समोर येत आहे. या ही डीश एका भजीची असून ती कांदा, बटाटा, मिरची नव्हे तर ओरिओ बिस्कीटची आहे. हो तुम्ही बरोबर वाचलं आहे. पण हां या डिश चा व्हिडीओ सोशल मिडीयावर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे, जसं चॉकलेट समोसा सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता. ही विचित्र डिश पाहून नेटकरी मात्र खूपच संतापले आहेत.

काही दिवसांपूर्वी ‘ओरियो मॅगी’ कशी बनवावी हे दाखवणाऱ्या व्हिडीओने नेटिझन्सना हैराण केलं होतं. त्यानंतर आता ‘ओरिओ बिस्कीटची भजी’ बनवल्याचा व्हिडीओ सध्या समोर आलाय. विविध प्रकारचे स्ट्रीट फूडचे वेगवेगळे फूड कॉम्बिनेशन समोर येण्यापर्यंत ठीक होतं. पण, थेट ओरिओ बिस्कीट आणि भजी असं काहीतरी कॉम्बिनेशन नेटकऱ्यांना काही रुचलेलं दिसत नाही. हा व्हायरल व्हिडीओ पाहून खवय्यांची तळपायाची आग मस्तकात गेलीये.

फूड ब्लॉगर अमर सिरोही याने त्याच्या ‘फूडी इनकार्नेट’ या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर केलाय. विशेष म्हणजे, फक्त नेटिझन्सच नव्हे तर स्वतः फूड ब्लॉगर सुद्धा या विचित्र फूड कॉम्बिनेशनमुळे हैराण झालाय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक व्यक्ती ओरिओ बिस्कीटच्या पाकिटातून बिस्कीट काढताना दिसून येतोय. ही बिस्किटं बेसन पीठात घोळवून मग तेलात तळताना दिसून येतोय. त्यानंतर मिरचीसोबत ही ओरिओ बिस्कीटची भजी लोकांना सर्व्ह करताना दिसून येतोय. अहमदाबादमधल्या ‘रोकड्या भजिया’ फूड स्टॉलवर ही ओरिओ बिस्कीटची भजी मिळतेय. तुम्हाला विश्वास होत नसेल तर हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

आणखी वाचा : PHOTOS : ‘हे’ देशी जुगाड पाहून तुम्ही हैराण व्हाल! यांच्याकडे प्रत्येक प्रोब्लेमवर आहे सोल्यूशन

या व्हिडीओला आतापर्यंत ९२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून भजी प्रेमींना अक्षरशः वेड लावलंय. नव्याने आलेल्या या ‘ओरिओ बिस्कीटची भजी’ने भजीची संकल्पनाच बदलून टाकली आहे. भजीची ही अनोखी चव कल्पना करूनच हैराण करणारी आहे. विचार कर मग ती प्रत्यक्षात कशी असेल? सोशल मीडियावर हा ओरिओ बिस्कीटची भजी चर्चेचा विषय ठरलीय.

आणखी वाचा : ‘तुम्ही यूएन मिस केलं!’, फूड डिलिव्हरीसाठी PM आणि CM ना टॅग केलेल्या अभिनेत्याच्या ‘त्या’ ट्विटवर नेटिझन्सच्या कमेंट्सचा महापूर

व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक भजीच्या नव्या प्रकारच्या रेसिपीवर अक्षरश: चिडले आहेत. खरं तर बरेच युजर्स भजीच्या रेसिपीवर समाधानी नाहीत. काही युजर्सनी तर या प्रकारच्या भजीवर विनोद कऱण्यात सुरूवात केलीय.

स्ट्रीट फूडच्या नावाखाली अनेक विक्रेते काही नव्या संकल्पनांना जन्म देतात. पण, काही संकल्पना या न पटण्याजोग्या असतात. ही ओरिओ बिस्कीटची भजी काही खवय्यांसाठी त्यापैकीच एक ठरत आहे. तुम्ही असा एखादा विचित्र पदार्थ कधी पाहिला किंवा चाखला आहे का?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: This street food stall in ahmedabad sells oreo pakoda and netizens are not pleased prp

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या