Viral Video :- लग्न समारंभात, ऑफिसमध्ये मिटिंगसाठी ‘टाय’ हा उत्तम पर्याय आहे;जो तुम्हाला परफेक्ट लूक देण्यास मदत करतो.पण अनेकदा टाय कसा बांधायचा असा प्रश्न अनेकांना पडतो.टाय बांधण्याच्या वेळी आपण युट्यूबवर व्हिडिओ शोधतो आणि टाय बांधतो.तर आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात काही सेकंदात टाय कसा बांधायचा हे एका व्यक्तीने दाखवलं आहे.
या व्हिडिओत टाय कसा बांधायचा हे अवघ्या काही सेकंदात शिकवण्यात आले आहे.टायचा एक रूंद आणि एक अरूंद भाग असतो.व्हिडिओत सगळ्यात पहिला टायचा अरूंद भाग हातावर ठेवण्यात आला आहे.त्यानंतर टायच्या दुसऱ्या रुंद भागाला डावीकडे वळवून दोनदा गुंडाळून ठेवण्यात आलं आहे.त्यानंतर दोन छोटे कप्पे तयार झाले आहेत.तर त्यातील दुसऱ्या कप्याला पहिल्या भागातून खेचून, त्याला घट्ट केल्यावर गाठ बसलेली तुम्हाला व्हिडिओत दिसेल आणि टाय बांधून तयार होईल. कशी सेकंदात एकदम परफेक्ट टाय बांधून तयार झालेला तुम्हाला व्हिडिओत दिसून येईल.
हेही वाचा :- मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी शिक्षकांनी तयार केला अनोखा खेळ; सर्वजण आनंदाचे होतायत सहभागी; पाहा Video
व्हिडीओ नक्की बघा :-
हा व्हिडिओ (tansuyegen) या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.जो अनेकांच लक्ष वेधून घेत आहे.ही टाय बांधायची सोपी पद्धत अनेकांना आवडली असून एका व्यक्तीने व्हिडिओच्या कमेंटमध्ये अशाचं पद्धतीने टाय बांधून व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे.