सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. यात सिंह आणि वाघांचा क्रमांक पहिला येतो. ते जगातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानले जातात, जे मानवांवर देखील हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना भूक लागली तर ते कोणालाही आपला बळी बनवू शकतात. यामुळेच या धोकादायक प्राण्यांना पिंजऱ्यात बंद करूनही लोक त्यांच्याजवळ जाण्यास टाळाटाळ करतात. मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तरुणी चक्क वाघासोबत फोटो काढण्यासाठी गेली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी वाघाच्या पिंजऱ्यात गेली आहे. सुरुवातीला तरुणी वाघासोबत खेळत असल्याचं दिसत आहे, मत्र थोड्यावेळाच वाघ तरुणीचा हाच पकडू लागतो, आणि हाताला चावयला लागतो. तरुणी वाघाच्या तावडीतून सुटकेचा प्रयत्न करते मात्र वाघ आता तिचा पायही पकडतो. त्यामुळे तरुणीला काहीच करता येत नाही. वाघ फक्त तरुणीचा पायच पकडतो असं नाही तर, तरुणीच्या पायाला चावण्याचाही प्रयत्न करतो. जेव्हा तरुणीला हा प्रकार गंभीर वाटायला लागतो तेव्हा ती व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला कॅमेरा बंद करायला सांगते आणि मदत मागते. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Earth Reels (@earth.reel)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – Video: वडाळा रेल्वे स्टेशनवर रेल्वेखाली आली महिला, १ सेकंदाच्या फरकाने वाचले वृद्ध महिलेचे प्राण

हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत, या तरुणीचं पुढे काय झालं याची काहीच कल्पना नाहीय. नेटकरीही व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.