लोकांना कायमच वन्य जीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. वन्य जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बरेचजण जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. वाघ आणि मगरीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

अनेकदा सोशल मीडियावर जंगलात राहणाऱ्या धोकादायक प्राण्यांचे विविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जर तुम्हाला वन्यजीवांमध्ये रस असेल तर तुम्हाला हे व्हिडीओ नक्कीच आवडतील. प्राणी जग अद्वितीय आहे आणि कधीकधी आपल्याला आश्चर्यचकित करते.दरम्यान एका वाघानं मगरीला चांगलच अस्मान दाखवलंय. वाघ मगरीच्या तावडीतून अतिशय हुशारीनं सुटला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

karma hit back on young boys who messed with the cow
Video : गायींबरोबर पंगा घेणे तरुणाला पडले चांगलेच महागात, थेट हवेत उडवले अन्…, व्हिडीओ होतोय व्हायरल
Farmer Caught A Leopard In The Field And Started Taking A Selfie Video
शेतकऱ्याचा नाद नाही! वावरात आलेल्या बिबट्यासोबत घेतली सेल्फी; VIDEO व्हिडीओ पाहून लोकंही अवाक्
The Boy Who Went To Express Love Got Injured By Girl
VIDEO: मरीन ड्राईव्हवर तरुणाला शहाणपणा नडला; प्रपोज करायला गेला अन् मार खाऊन आला; तरुणीनं अक्षरशः…
Leopard Crocodiles And Hyenas Fight For Deer Watch Who Will Win At Last Animal Video
VIDEO: दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ! बिबट्या तरस आणि मगरीमध्ये जोरदार युद्ध, शेवटी कोण जिंकलं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका वाघाने जबरदस्त कमबॅक केलाय. एका तळ्यातील पाणी पित असताना वाघावर विशाल मगरीने पाण्यातून बाहेर येत हल्ला केला. या मगरीने इतक्या ताकदीने हल्ला केला की, भल्यामोठ्या वाघाला तिने पाण्यात खेचून नेलं. विशेष म्हणजे मगरीच्या तावडीतून सुटण्यासाठी वाघाने खूप प्रयत्न केले मात्र मगरीने त्याला आपल्या पाण्यात ओढून नेलंच. मात्र याचवेळी असं काहीतरी घडतं ज्याची आपण कल्पनाही केलेली नाही. वाघानं जबरदस्त ताकद लावून मगरीच्याच घरात तिची शिकार तिला पाण्याबाहेर घेऊन येतो. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले असून, या व्हिडिओवर आपापल्या पद्धतीने प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>संतापजनक! होळीच्या नावाखाली जोडप्यासोबत टवाळखोरांचं गैरवर्तन; वाराणसीतील VIDEO समोर

हा चित्तथरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @tazeemkingkhan786 नावाच्या युजरने शेअर केला आहे, जो आतापर्यंत १५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.लोक वारंवार हा व्हिडीओ पाहात आहेत. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या.