मानवाने केलेल्या विकासामुळे जीवन अगदी सोपे झाले आहे. पण या बदलांमुळे त्यांनी प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासालाही बाधा पोहोचवली आहे. प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न सुरूच आहेत. त्यात इंटरनेटवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्रातील ताडोबा राष्ट्रीय उद्यानात वाघ आणि त्याचे पिल्लू रस्ता ओलांडत असताना लोकांचा मोठा जमाव थांबवण्यात आला.

वन्यजीव जीवशास्त्रज्ञ मिलिंद परिवाकम यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ११ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या बाजूला लोकांचा एक मोठा जमाव वाघ आणि त्याच्या पिल्लाला शांततेने रस्ता ओलांडताना पाहत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील ताडोबा जंगलातील रस्त्यांचा असून वनाधिकाऱ्यांना वाहतूक यशस्वीपणे रोखण्यात यश आले आहे.

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: ‘तो’ ट्रेनमध्ये चढला आणि…; ट्रेनमध्ये दरवाज्याजवळ उभे राहण्याची सवय असेल तर ‘हा’ Video एकदा बघाच)

पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “ताडोबाच्या आजूबाजूला रस्ते ओलांडताना दररोज वाघ आणि इतर वन्यजीव धोक्यात येतात. @MahaForest @mahapwdofficial द्वारे एनजीटीच्या आदेशांची पूर्ण अंमलबजावणी कधी केली जाईल.” मिलिंद परिवाकम यांनी ट्विटरवर यासंबधित आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

( हे ही वाचा: Video: नदीच्या पाण्यात तोंड धुवत होती तरुणी, त्यानंतर जे घडलं…; तरुणीच्या कायम लक्षात राहील ‘हा’ क्षण)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तसंच या व्हिडिओला अनेक लाईक्स देखील मिळाले आहेत. अनेकजण या व्हिडिओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.