अनेकांना हाताच्या पाचही बोटात अंगठी घालण्याचा छंद असतो. अंगठी प्रेमींकडे विविध अंगठ्यांचा कलेक्शन सापडते. अंगठी घातल्यावर बोटं फॅशनेबल दिसतात. अंगठीमुळे बोटांची शोभा वाढते. त्यामुळे काहींना बोटात अंगठी घालण्याचा मोह आवरत नाही. अंगठी खरेदी करताना आपण विचार न करता बोटात अंगठी घालतो, मग ती फसण्याची शक्यता देखील वाढते. काही वेळेला बोटं सुजल्यानंतरही अंगठी अडकते. ज्यामुळे बोटांमधील ब्लड सर्क्युलेशन बिघडते. बोटात अंगठी अडकण्याची कारणे अनेक असू शकतात. असाच एक प्रकार समोर आला आहे, एका व्यक्तीच्या बोटात अंगठी रुतुन बसली आहे त्यामुळे त्याच्या बोटाला मोठी इजा झाली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

या व्हिडीओमध्ये या व्यक्तीच्या बोटाची अवस्था तुम्ही पाहू शकता, त्या व्यक्तीने तीच अंगठी बराच काळ घातली होती. त्यामुळे अंगठी आत रुतत राहिली. अंगठीचा फक्त वरचा रुंद भाग दिसतो. तर उर्वरित भाग बोटाच्या आत गेला आहे, जो दिसत नाही. आता कल्पना करा की घट्ट अंगठी घालणे किती धोकादायक असू शकते.

अशी चूक अनेकजण करताना दिसतात. अंगठी घातल्यानंतर ते ती काढायला विसरतात आणि अनेक वर्षे ती घालत राहतात. अशी चूक कधीही करू नका. अंगठी अशा प्रकारे घाला की ती घट्ट होणार नाही. अंगठी घट्ट होत असेल तर ती घालण्याची चूक करू नका.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘DARK’ शब्दाच्या गर्दीत लपलाय एक वेगळा शब्द, या कोड्यांसमोर भल्याभल्यांनी टेकले हात, तुम्हाला सापडतो का बघा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण अडकलेली अंगठी काही घरगुती उपायांनी देखील काढू शकता. यासाठी आपण साबण, पेट्रोलियम जेली,  हँड लोशन, तूप, हेअर कंडिशनर, शॅम्पू, अँटीबायोटिक मलम, कुकिंग स्प्रे अशा अनेक उपायांच्या मदतीने अंगठी काढू शकता. तूप, कुकिंग ऑइल, बेबी ऑइल यासारखे पदार्थ बोटातून काही वेळात अंगठी काढण्यास मदत करतील.