Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच आपल्या गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. त्याची ही धडपड आणि काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती पाहू नेटकरी तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत. चिमुकल्याची ही धडपड आणि सुंदर कृतीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. ऊसतोड कामगाराच्या मुलाची धडपड पाहून तुमचेही डोळे पाणी पाणावतील.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला दुपारच्या भर उन्हात शेतात ऊसाचे वाडे उचलताना दिसत आहे. एवढ्या लहान वयात आलेली जबाबदारी हा चिमुकला चोख पार पडत आहे. या वयात काही मुलं स्वत:च्या हाताने जेवायलाही नाही म्हणतात. मात्र हा चिमुकला एवढ्या कमी वयातही घरच्यांना मदत करताना दिसत आहे. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही, तर असंख्य धडे हे आयुष्य शिकवत असतं. याचंच उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ. खेळण्याच्या वयात, आईकडे हट्ट करण्याच्या वयात हा चिमुकला घरच्यांना मदत करत आहे. आई वडिलांना मदत करताना खारीचा वाटा उचलत आहे. या वयात मुले शाळेत जाण्यासाठीही रडारड करतात, त्या वयात हा चिमुकला भर उन्हात काम करत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: वाघाने दाखवलं मगरीला अस्मान! तावडीतून असा सुटला की, मगरच तोंडावर आपटली! वाघाचा जबरदस्त कमबॅक एकदा बघाच

चिमुकल्याची ही धडपड आणि कष्टाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. लेक असावा तर असा असे म्हणत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी परिस्थिती सगळं काही शिकवते, असे म्हणत त्या चिमुकल्याच्या जिद्दीला दाद दिली आहे.