आई आणि मुलांचे नाते हे जगातील सर्व नात्यांपेक्षा खूप खास आणि अनमोल असते. सोशल मीडियावर आई आणि मुलांशी संबंधित एकापेक्षा एक व्हिडिओ येत असतात. यातील काही व्हिडीओ आपणाला हसवतात तर काही हृदयाला भिडतात आणि भावूक करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान मूल वादळात आपल्या आईला मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी लहान मुलाचे कौतुक केले आहे.

खरं तर मुलांचे त्यांच्या आईशी खूप घट्ट नाते असते. अनेकदा, मुलं आपल्या आई-वडील कष्टाची काम करताना लहान मुलं त्यांना होईल तशी मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक चिमुकला आपल्या आईला वादळी वाऱ्यात मदत करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जोराच्या वादळी वाऱ्यामुळे एक खुर्ची उडून जाते, त्यावेळी चिमुकला मागचा पुढचा विचार न करता पळत जातो आणि ती खुर्ची आपल्या आईकडे घेऊन येतो.

हेही वाचा- “बायकोच्या पायांची मालिश…” मुलगा करोडपती, आई करते दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी…; वृद्ध महिलेने सांगितली धक्कादायक कहाणी

व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्याकडेला असणारे आपले दुकान वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाल्यामुळे बंद करताना दिसत आहे. पण यावेळी वारा इतक्या जोराने येतो की तिच्या हातातील ताडपत्री वाऱ्याने उडून जाताना दिसत आहे. यावेळी महिलेशेजारी उभा असणारा चिमुकला आपल्या आईच्या हातातील ताडपत्री ती उडून जाऊ नये यासाठी ती धरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शिवाय आईला होणारा त्रास कमी व्हावा यासाठी चिमुकल्याने केलेले कृत्य सगळ्यांची मन जिंकणारं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाचा हा भावूक व्हिडिओ strictlyformeme नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, जबाबदारी पाहून मुलगा माणूस बनतो, असं लिहिलं आहे. सध्या या चिमुकल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी “परिस्थिती माणसाला घडवते, ती काहीही करायला लावते” असं लिहिलं आहे. तर एका नेटकऱ्याने, या कुटुंबाला सदैव आनंदी राहण्यासाठी देवाने मदत करावी अशी माझी इच्छा आहे, असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर वेगवेगळ्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून नेटकरी मुलावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.