Crocodile video: मगरीचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. या व्हिडीओत तुम्ही मगरीला शिकार करताना पाहिलं असेल. कुणीही प्राणी-पक्षी तिच्यासमोर आला की त्याचं वाचणं अशक्यच. मगर त्याच्यावर हल्ला करतेच. अगदी वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणीही जेव्हा पाणी प्यायला जातात तेव्हा ते मगरीच्या भीतीने सावधपणे पाणी पितानाही दिसतात. पण अशाच मगरीच्या समोर अगदी बिनधास्तपणे गेलं ते एक कासवकासव आणि मगरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतो आहे. एका कासवाने चक्क मगरीसमोर जाण्याची डेअरिंग केली. आता कासव स्वत:हून मगरीसमोर जाणं म्हणजे मृत्यूच्या दारात गेल्यासारखंच आहे. पण इथं मात्र उलटंच घडलं. कासव मगरीजवळ गेलं आणि असं काही घडलं की जे पाहून आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. कासवाने मगरीसोबत जे केलं आणि त्यानंतर मगरीने जी प्रतिक्रिया दिली ते पाहून असंही घडू शकतं, याचा विचार आपण स्वप्नातही करू शकत नाही.

या व्हिडिओमध्ये एक महाकाय मगर कासवाची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहे. पण कासव आपला जीव वाचवण्यासाठी मगरीच्या तावडतून पळून जाण्यात यशस्वी होतो. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Shocking Accident in Ahmedabad Terrifying CCTV Footage Shows Biker Run Over By Speeding Bus
Accident: घर गाठण्याआधी काळाने गाठलं! गुजरातमध्ये बसचालकाची मुजोरी बाईकस्वाराच्या जीवावर बेतली
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
funny Puneri patya video
“फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास..” पुणेरी पाटी चर्चेत; नेटकरी म्हणाले, “पुणेकर होण्यासाठी ..”
Viral Video Instagram influencers parking their car midway in traffic on a flyover To Make A Reel
रीलसाठी कायपण! रस्त्याच्या मधोमध थांबवली गाडी अन्… VIDEO पाहून नेटकरी संतापले

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कासवाला तोंडात अडकवण्यात मगरी यशस्वी झाल्याचे दिसत आहे. पण मगर जास्त वेळ कासव तोंडात पडू शकला नाही. यानंतर कासव कसा तरी जीव वाचवण्यासाठी मगरीपासून पळून जातो. दरम्यान, जीवन-मरणाच्या लढाईतही कासव जिंकले आहे.  हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AMAZlNGNATURE हँडलसह शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर दोन हजारांहून अधिक लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. असा व्हिडिओ समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आश्चर्य व्यक्त केले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> चोर निकल के भागा! धावत्या ट्रेनमध्ये चोर महिलेची सोनसाखळी चोरून पसार; प्रवाशांनो “हा” VIDEO एकदा बघाच

व्हायरल व्हिडिओवर युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘कासव खूप हुशार निघाले.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘मगर खूप आळशी दिसत होती.’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले, ‘अखेर कासवाचा विजय झाला.’