Shocking video: एखाद्या युनीक गोष्टीचं कौतुक प्रत्येकाला असतं, नवं काहीतरी, धाडसी काहीतरी ट्राय करायला बऱ्याच लोकांना आवडतं. असे लोक वेगवेगळे स्टंटही करत असतात, अॅडवेंचर करायची संधीच ते जणू शोधत असतात. काचेच्या पूलाबद्दल तुम्ही एकलंच असेल तसेच त्याचे व्हिडीओही पाहिले असतीलच. काचेच्या पुलावर कसं चालायचं? पूल तुटला तर? काच फुटली तर असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. मात्र कारागीर त्याच्या कुशलतेने अगदी मजबूत तो पूल बांधतो.

मात्र तुम्हाला पडणारे हेच प्रश्न खरे ठरले आहेत. एका काचेच्या पुलावरुन पडून पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काचेचा पूल अचानक फुटतो आणि पर्यटक खाली पडतात. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

ही घटना इंडोनेशियात घडली आहे, याठिकाणी काचेचा ब्रीज फुटला आहे. ब्रीजवर पर्यटक असताना ही दुर्घटना घडली आहे, यावेळी ११ पर्यटक तब्बल ३० फूट खाली कोसळले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन हातांनी ब्रीजला पकडल्यासारखं त्याचं स्ट्रक्चर बनवलं आहे. दरम्यान या ब्रीजवरुन पडून एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पर्यटक काचेच्या ब्रीजवर आनंद घेत असताना अचानर काचा फुटण्यास सुरुवात झाली, ज्यावेळी ब्रीज तुटायला सुरुवात झाली त्यावेळी ब्रीजवर ११ पर्यंटक होते, यातील २ जण ३० फूट खाली कोसळले. व्हिडीओमध्ये पाहू शकता इतर प्रवाशांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जन्म देणाऱ्या आईचे जनावरासारखे हाल! केस ओढून डोकं आपटलं, कानाखाली लगावली अन्…संतापजनक VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @MetroUK या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.