Traffic Police Viral Video : तुमच्यापैकी जवळपास सर्वांनाच वाहतुकीचे नियम माहीत असतील. तुम्ही वाहन चालवताना त्यापैकी एक जरी नियम मोडला, तरी वाहतूक पोलिस चलान कापतात. काही घटनांमध्ये तर लायसन्स रद्द केले जाते. त्यात वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळतात की नाही याची तपासणी करण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली जाते. हल्ली वाहतूक पोलिस गल्लीबोळात रस्त्यांवर उभे राहून वाहनचालकांना शिस्तीचे धडे देताना दिसतात.

त्याशिवाय विनाहेल्मेट बाइक चालवणे, ट्रिपल रायडिंग किंवा ड्रायव्हिंग लायसन्सविना वाहन चालवणाऱ्या चालकांनाही कोणतेही चलान भरावे लागतो. परंतु, इतरांना वाहतुकीचे नियम शिकवणारे वाहतूक पोलिसच जर वाहतुकीचे नियम पाळत नसतील तर? सध्या सोशल मीडियावर वाहतूक पोलिसांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; जो पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. वाहतूक पोलिसांचा हा व्हिडीओ भिवंडी रोड (ठाणे)मधील असल्याचा दावा व्हिडीओत करण्यात आला आहे. या व्हिडीओत दोन वाहतूक पोलिस चक्क दोन रस्त्यांच्या मधोमध असलेल्या छोट्या फूटपाथवरून बाइक चालवताना दिसत आहे. अशा प्रकारे रस्त्यांच्या मधोमध असलेल्या छोट्या फुटपाथवरून वाहन चालवण्यास परवानगी नाही. तरीही हे वाहतूक पोलिस अगदी हायवेवरील या फुटपाथवरून बाइक चालवीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना वेगळे नियम आणि वाहतूक पोलिसांसाठी काही वेगळे नियम आहेत का, असा संतप्त सवाल लोक करीत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन वाहतूक पोलिस बाइकवरून कुठेतरी जात आहेत. पण, ते रस्त्यावरून नाही तर दोन रस्त्यांच्या मधोमध बांधलेल्या फूटपाथसारख्या जागेतून बाइक चालवीत आहेत. अनेकदा या जागेत झाडे लावलेली असतात. पण, या मोकळ्या दिसणाऱ्या जागेचा वापर वाहतूक पोलिसांनी चक्क वाहन चालवण्यासाठी केला आहे.

हा व्हिडीओ @fouzankhatkhate0027 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे अनेकदा अपघात किंवा कुठे वाहतुकीची समस्या निर्माण झाली असेल, तर वाहतूक पोलिसांना नियम तोडून गाडी चालवीत परिस्थिती हाताळावी लागते, असेही मत अनेकांनी मांडले आहे. तर काहींनी हा व्हिडीओ अर्धवट माहिती देणारा असल्याचे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय काही जण यात असे आहेत की, ज्यांनी पोलिसांनी असे नियम मोडणे अतिशय चुकीचे असल्याचे मत नोंदवले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता खूप व्हायरल होत आहे. त्यावर लोक भरभरून कमेंट्स करीत आहेत. तर असे अनेक लोक आहेत; जे या व्हिडीओला शेअर आणि लाइक करीत आहेत.