Shocking Video Viral: एका सेकंदाच्या वेळेने जर एखाद्याचे संपूर्ण आयुष्य वाचू शकते, तर त्याचं प्रत्यंतर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका थरारक व्हिडीओमधून मिळतंय. या व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध महिला मृत्यूच्या तोंडातून अक्षरशः निसटून गेल्या आहेत. हा प्रसंग इतका थरारक आहे की पाहणाऱ्यांचाही श्वास रोखला जातो. जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान आपण जे क्षण जगतो ते खरं आयुष्य असतं. जीवन-मृत्यू हा आयुष्याचा अंत आणि आरंभ आहे म्हटले जाते. असे म्हणतात आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाना जगला पाहिजे कारण मृत्यू कधी काळ म्हणून समोर येईल सांगता येत नाही. अनेकदा लोकांच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा मृत्यूशी सामना होतो. काहीजण मृत्यूच्या दारातून परत येतात. अनेकांची असे अनुभव आपल्याला नेहमी ऐकायला किंवा पाहायला मिळतात. दरम्यान अशाच एका क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पावसाळ्यात दरवर्षी अनेक अपघातांच्या, दुर्घटनांच्या घटना समोर येत असतात. भिंती कोसळण्याच्या घटना, झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार, रस्त्यांवर पाण्याचा साठा, विजेचा धक्का, स्लिप होणे अशा असंख्य गोष्टींमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. अशातच एक थरारक घटना समोर आली आहे जिथे एक वृद्ध महिला अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बचावली गेली आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला घराच्या दिशेने जाताना दिसत आहे. यावेळी ती केवळ १ सेकंद होत नाहीत, तोच ती जिथून नुकतीच एक पाऊल पुढे आलेली असते तिथे भलमोठी शाळेची भिंत कोसळते. पावसामुळे भिंतीचा पाया कमजोर झाला होता आणि ती संपूर्ण भिंत भर्रकन कोसळली. ज्या ठिकाणी ही महिला काही सेकंदांपूर्वी होती, तिथेच ही भिंत कोसळते.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आपल्यासमोर दररोज हजारो व्हिडीओ येत असतात, ज्यापैकी काही व्हिडीओ हे खरंच आपल्या मनात घर करून बसतात. पण काही व्हिडीओ असेदेखील असतात, जे आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.सोशल मीडियावर हा व्हिडिओ fuddu_sperm या इन्स्टाग्राम अकाऊटंवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवरही आता लोक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.