Train Couple obscene act: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर धावत्या रेल्वेमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रेमीयुगुलांनी निर्लज्जपणाची सीमा ओलांडली असून अशा कृत्यांमुळे कोणत्याही व्यक्तीला आता कुटुंबीयांसह रेल्वेमधून प्रवास करताना दहा वेळा विचार करावा लागेल. प्रेमीयुगुलाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली पाहिजे, अशीही मागणी केली जात आहे.

अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हे जोडपे लोकांसमोर निर्लज्जपणाची हद्द ओलांडताना दिसले. हे जोडपे रेल्वेच्या सीटवर आक्षेपार्ह अवस्थेत पडलेले दिसलेले असून जेव्हा टीटीई पोहोचले आणि त्यांनी दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना आश्चर्यकारक प्रतिक्रिया मिळाली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, बहुतेक जागा रिकाम्या आहेत आणि कोचमध्ये मोजकेच प्रवासी आहेत. त्याच सीटवर एक जोडपे पडलेले आहे. हे जोडपे आक्षेपार्ह कृत्य करत आहेत. दरम्यान, टीटीई तेथे पोहोचल्यावर या जोडप्याने ना उठण्याचा प्रयत्न केला, ना त्यांच्या हालचाली थांबवण्याचा प्रयत्न केला.

(हे ही वाचा : PHOTO: “…तर बालपणीच्या प्रेमाशी लग्न..”; मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर तरुणाचे उत्तर ऐकून पोटधरून हसाल )

व्हिडीओमध्ये काही वेळानंतर एक मुलगी तिच्या कुटुंबासोबत समोरच्या सीटवर बसलेली दिसत आहे, परंतु असे असूनही या जोडप्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि ते त्याच सीटवर पडून राहिले. हा व्हिडीओ कोणीतरी रेकॉर्ड केला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोक संताप व्यक्त करत आहेत, तर काही जण या जोडप्यावर टीका करत आहेत. एकाने लिहिले की, “प्रेमात माणूस इतका आंधळा होतो की सार्वजनिक ठिकाणी लहान मुले आणि वृद्ध महिलेसमोर तो सर्व मर्यादा ओलांडत आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे.” एकाने लिहिले की, “आता महिला, मुली किंवा अल्पवयीन मुलांसाठी रेल्वेने प्रवास करणे सुरक्षित आहे का? अशा जोडप्यांच्या कृत्यामुळे सगळ्यांना भीती वाटेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडिओ

एकाने लिहिले की, “आधी ते घाणेरडे कृत्य करत आहेत पण त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणे हा त्याहून मोठा गुन्हा आहे. स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या, खूप त्रास झाला तर पोलिसांना फोन करा. तुम्ही व्हिडिओ का रेकॉर्ड करत आहात?” दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लोक या जोडप्याच्या बेजबाबदार आणि असभ्य वर्तनावर टीका करत आहेत.