सध्याच्या इंटरनेटच्या युगात क्वचितच कोणी पत्र किंवा पोस्टकार्ड लिहित असेल. मात्र, पूर्वीच्या काळी ते एकमेकांशी संवाद साधण्याचे एक मजबूत आणि विश्वासार्ह माध्यम होते. जगाच्या अनेक भागात पूर्वीचे लोक पोस्टकार्डद्वारे एकमेकांना संदेश पाठवायचे. शिवाय ते संदेश वेळेवर पोहोचायचे तर कधी कधी त्याला उशीरही व्हायचा. मात्र हा उशिर जास्तीत जास्त एक आठवड्याचा असायचा. पण सध्या एका पोस्टकार्डची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. कारण या पोस्टकार्डला नमूद केलेल्या पत्त्यावर पोहोचायला एक दोन नव्हे तर तब्बल ५४ वर्षे लागली आहेत.
हो कारण एका फेसबुक यूजरने या घटनेबाबत पोस्ट करून माहिती दिली आहे. फेसबुकवर जेसिका मीन्स नावाच्या युजरने लिहिलं आहे, “हे रहस्य सोडवायला मला मदत करा! मला हे जाणून घ्यायचे आवडेल की, अनेक दशकांनंतर हे घरी कसे पोहोचले. २०२३ मध्ये टालहासी येथून कोणी मेल केले याची माहिती तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाकडे आहे का?.”
हेही पाहा- “जगणं सुधारेल वाटलं पण…”, मुंबई लोकलच्या प्रवाशाची व्यथा; शेवटी कुत्र्यालाही राहवलं नाही, आला अन्…
त्यांनी पुढे लिहिलं, “हे पोस्टकार्ड आज मला मेलद्वारे मिळालं, पत्त्यावर मिस्टर आणि मिसेस रेने गगनन किंवा सध्याचे रहिवासी असे लिहिले आहे. हे पोस्टकार्ड १५ मार्च १९६९ रोजी पॅरिसमधून पोस्ट केले गेले होते. ज्याला नमूद पत्त्यावर पोहोचण्यासाठी ५४ वर्षे लागली. त्यावर फ्लोरिडा येथील टालहासीचा पत्ता आहे. तर नवीन पोस्टमार्क १२ जुलै २०२३ चा आहे.
पोस्टकार्डमध्ये काय लिहिले आहे?
पोस्टकार्डवर लिहिले आहे, “प्रिय लोकांनो, तुम्हाला हे प्राप्त होईपर्यंत मी घरी पोहोचेन.” पंरतु याला आयफेल टॉवर येथून पाठवणे योग्य वाटते, जिथे मी सध्या आहे. फार काही बघायची संधी मिळाली नाही पण मजा येत आहे. दोन दिवसांपूर्वी ही पोस्ट फेसबुकवर शेअर करण्यात आली असून ही पोस्ट अनेक लोक शेअर करत आहेत, शिवाय नेटकरी ही पोस्ट लाईक करुन त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं आहे, “काय कथा आहे. छान!” तर दुसर्या नेटकऱ्याने हे खूप आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे.