सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपलं मनोरंजन करणारे असतात तर काही आपणाला आश्चर्यचकित करणारे असतात. तर काही काही व्हिडीओ असे असतात, जे आपणाला आश्चर्यचकीत करतातच आणि सोबत आपलं मनोरंजनही करतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून काही नेटकऱ्यांना धक्का बसला आहे, तर काहींना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. हो कारण या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क बाईकवरुन एका भल्यामोठ्या बैलाला घेऊन निघाल्याचं पाहायला मिळत आहे.
खरं तर, आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कारमधून कुत्रा किंवा मांजर असे पाळीव प्राणी घेऊन प्रवास करताना पाहिलं असेल. शिवाय असे अनेक लोक आहेत, ज्यांना आपल्याबरोबर सदैव घरातील पाळीव प्राणी घेऊन जाण्याची सवय असते. परंतु, एखाद्या व्यक्तीने घरातील बैलाला सोबत घेऊन बाईकवरुन प्रवास केल्याचं तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं आहे का? नक्कीच तुमचं उत्तर नाही असं असू शकतं. परंतु आता तुम्हाला ते देखील पाहायला मिळणार आहे. कारण बैलाला बाईकवर बसवून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही पाहा- हाताखाली बसचे स्टेअरिंग अन् लक्ष मोबाईलमध्ये; अशी जीवघेणी ड्रायव्हिंग कधी पाहिली आहे का? पाहा Video
बैलाला बाईकवर बसवून केला प्रवास –
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एका व्यक्तीने त्याच्या बाईकवर एका भल्यामोठ्या बैलाला बसवल्याचं दिसत आहे. या बाईकवर बसलेल्या बैलाला मोठी शिंग असून त्याचा मालक मागे बसला आहे, जो मागून भरधाव वेगाने बाईक चालवत आहे. तर यावेळी त्या रस्त्यावरुन जाणाऱ्या एका कार चालकाने या अनोख्या घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
बैलाला बाईकवर घेऊन प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ @nareshbahrain नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “अशा पद्धतीने तुम्ही शर्यतीत बैलाला पळवू शकता.” १२ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांना तो लाईक केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांना या बैलाला बाईकवर कसं बसवलं असेल असा प्रश्न पडला आहे. तर काही युजर्सनी जगात टॅलेंटची कमतरता नाही, अशी कमेंट केली आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबतची माहिती मिळालेली नाही. परंतु काही लोक हा व्हिडीओ नायजेरियातील असल्याचे सांगत आहेत.