अनेकदा खराब पादत्राणे किंवा चालण्याच्या गडबडीत लोक घसरतात आणि पडतात. शिवाय फरशीच्या गुळगुळीतपणामुळेही अनेक लोक पडतात आणि जखमी होतात. परंतु एखाद्या ठिकाणी असं घसरुन पडलं म्हणून कोणी कोणावर दावा ठोकत नाही. पण एका महिलेने असंच केलं आहे. हो मिळालेल्या माहितीनुसार, ६७ वर्षीय एलिस कोहेन नावाची महिला बोस्टनमधील एका रेस्टॉरंटमध्ये घसरून गंभीर जखमी झाली म्हणून तिने चक्क रेस्टॉरंटवर दावा ठोकला आहे.

या महिलेने तिचा पती रोनाल्ड कोहेनच्या साथीने रेस्टॉरंटवर कायदेशीर कारवाई केली. दाव्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘एलिस शारीरिक जखमा झाल्या, तिच्या जीवनातील आनंद संपला आणि खूप वैद्यकीय खर्चही सहन करावा लागला.’ तर ही घटना बॉयल्स्टन स्ट्रीटच्या ८०० ब्लॉकमधील एका रेस्टॉरंटमध्ये घडली आहे.

हेही पाहा- ही खरी देशभक्ती! तिरंग्याची शान जपण्यासाठी चिमुकला उतरला नाल्यात, VIDEO पाहिल्यानंतर तुम्हीही कराल सलाम

चालताना घसरला होता पाय –

७ ऑक्टोबर २०२२ रोजी एलिस रेस्टॉरंटच्या एका भागात फिरत होती यावेळी चालताना ती पडली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं जात आहे. ११ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या खटल्यात जोडप्याने दावा केला की, रेस्टॉरंटची साफसफाई योग्य प्रकारे झाली नव्हती त्यांनी कामात निष्काळजीपणा केल्यामुळे रेस्टॉरंटमधील फरशीचा आमच्यासह इतर ग्राहकांना धोका निर्माण झाला होता.

फरशीवर पडली होती डिश –

कोहेनचे वकील डी. मायकेल नूनन हे म्हटले की, “फरशा स्वच्छ असल्याची खात्री करणे रेस्टॉरंटचे कर्तव्य होते. फरशीवर एक डिश पडली होती ज्यामुळे एलिस घसरली. शिवाय अशा धोकादायक परिस्थितींबद्दल सूचना देण्याची जबाबदारी रेस्टॉरंटची होती.” तर पडल्यामुळे कोहेनला रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. ज्याचे बिल जवळपास ६ लाखांहून अधिक झाले होते. तर या जोडप्याने रेस्टॉरंटकडे तब्बल ४१ लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे. एका फर्म कायद्यानुसार, ‘एखाद्याला अशी गंभीर दुखापत झाल्यास कन्सोर्टियम नुकसान भरपाईची परवानगी दिली जाते.