सध्याच्या काळात खासगी कंपनीत नोकरी करणारे अनेक तरुण कामाच्या तुलनेत मिळणाऱ्या कमी पगारामुळे असमाधानी असतात. यामुळेच सोशल मीडियावर “quiet quitting” नावाचा ट्रेंड सुरु आहे. ज्यामध्ये कमी काम आणि चांगला पगार याविषयी बोलले जात आहे. अशातच आता टिकटॉकवर आणखी एक ट्रेंड सुरू झाला आहे ज्याला “आळशी मुलींची नोकरी” (lazy girl jobs) असे म्हटले जात आहे.

कमी काम आणि चांगला पगार…

Tiktok वर @antiworkgirlboss नावाच्या अकाऊंटरवरुन इन्फ्लुएन्सर असलेल्या गॅब्रिएल जजने व्हिडिओमध्ये या ट्रेंडबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.तिने सांगितलं की,आळशी मुलींची नोकरी हा ट्रेंड असा आहे, ज्यामध्ये कमी काम आणि कमी कष्टात कामाचा मोबदला मिळतो शिवाय या कामासाठी वेळेचे बंधनदेखील नसते. ज्यामुळे कर्मचार्‍यांच्या आयुष्यात चांगला वर्क बॅलन्स राहू शकतो.

हेही पाहा- १६ व्या शतकातील किराणा सामानाची यादी व्हायरल, पाहण्यासाठी संग्रहालयात लोक लावतायत रांगा

या ठिकाणी आहे नोकरीची शक्यता –

जजने सांगितलं की, अशा अनेक नोकऱ्या आहेत ज्यामध्ये ६० ते ८० हजार कमावता येतात आणि जास्त काम करावे लागत नाही, शिवाय ते काम घरूनही करता येते. मार्केटिंग असोसिएट, काही प्रकारचे अकाऊंट मॅनेजर आणि ग्राहक कस्टमर मॅनेजर अशा अनेक गैर-तांत्रिक भूमिका आहेत, ज्या या प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये येतात. तर दुसर्‍या व्हिडिओमध्ये, गेब्रियल जजने सांगिते की, ९ ते ५ ची नोकरी असणे देखील चांगले आहे, परंतु अशी नोकरी असणे, जिथे तुम्ही कामासह जीवनाचा समतोल राखू शकता, कामासाठी ठराविक वेळेचे बंधन नसने हा खरं आळशी मुलींचा जॉब आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये एक आळशी गर्ल जॉब प्रोग्राम कसा आहे हे देखील तिने शेअर केला आहे, ज्याचा उपयोग महिलांना अशा नोकऱ्या शोधण्यासाठी मदत होऊ शकते, असं सांगण्यात आलं आहे.

आळशी मुलींची नोकरी म्हणजे काय?

जज सांगते, “आणि आळशी मुलींच्या नोकरीचा अर्थ म्हणजे सुरक्षित, चांगला पगार देणारी, वर्क फ्रॉम होम सुविधा देणारी नोकरी. जेव्हा आपण पैशाची पर्वा करत नाही तेव्हा महिला शक्तिशाली, सुंदर आणि सर्जनशील बनतात.” तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे, “तुम्हाला पुढची आळशी मुलीची नोकरी कशी मिळवायची याबद्दल आमच्याकडे भरपूर संसाधने आहेत.”

महिलांसाठी उत्तम संधी –

तिने पुढे सांगितलं की, ही एक खूप चांगली संधी, कारण महिलांना एक तर घरातील कामं करावी लागतात किंवा करिअरसाठी घराबाहेर पडावं लागतं. दोन्हीपैकी एक निवडणं खूप कठीण होऊन जातं, अशा महिलासांठी हा ट्रेंड खूप चांगला आहे. ज्यामुळे त्यांना दोन्ही जबाबदारी पार पाडता येऊ शकतात. एक गृहीणी आणि दुसरी जॉबची.