Video viral on social media : राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. द्वेष आणि रागात, एखादी व्यक्ती अनेकदा विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता गमावते. या दरम्यान तो अशी कामे करतो, ज्यामुळे त्याचा जीव धोक्यात येतो आणि अडचणी येतात. राग आणि द्वेषाच्या भावनेने केलेल्या कामाचे वाईट परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागले असतील. मग नंतर त्याचा पश्चाताप होतो की, जर आपण रागाच्या भरात हा निर्णय घेतला नसता किंवा रागाच्या भरात हे पाऊल उचलले नसते तर आज आपल्यासोबत हे घडले नसते.

जैसे ज्याचे कर्म तैसे…

जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेकजण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जाता आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याचा आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते. याच ताजं उदाहरण देणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे कोणाशी तरी घट्ट वैर होते. वैरामुळे त्याने त्याचा बदला घेण्याचे ठरवले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की तो माणूस आजूबाजूला कोणीही नसाताना त्याच्या शत्रूच्या घराला आग लावण्याचा कट रचतो आहे. रॉकेल आणि माचिस घेऊन तो शत्रूच्या घराबाहेर उभा राहतो. आधी तो काठीने घराच्या खिडक्या तोडतो. खिडक्या फुटल्यानंतर तो रॉकेलने भरलेला डबा उचलतो आणि घरावर टाकतो. रॉकेल शिंपडल्यानंतर ती व्यक्ती माचिसची काडी घेते आणि आग लावल्यानंतर ती शत्रूच्या घरात फेकते. मात्र यावेळी हे त्याच्याच अंगलट येतं, कारण ती व्यक्ती घरामध्ये पेटलेली काडी फेकताच आगीच्या ज्वाला त्याच्या दिशेने येतात. त्यामुळे त्याचा चेहरा आणि केस जळू लागतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Video: मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा! दोस्ताला मृत्यूच्या दारातून खेचलं, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

आगीच्या कचाट्यात आल्यानंतर ती व्यक्ती स्वतःहून आग विझवण्याचा प्रयत्न करू लागते आणि मग तेथून पळून जाते. हा व्हिडीओ पाहून असे म्हणता येईल की जर तुम्ही इतरांचे वाईट केले तर तुमचेही वाईट होईल.