कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी आहे. तुम्ही त्याला जेवढा जीव लावाल त्याच्या दुप्पट तो तुम्हाला जीव लावत असतो. कुत्र्यासह अनेक पाळीव प्राण्यांनी आपल्या मालकाच्या प्रेमाची परतफेड केल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत. मात्र, सध्या एका पाळीव कुत्र्याची अशी कहाणी समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला त्याच्याबद्दल अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. हो कारण या कुत्र्याने आपल्या मालकाचा जीव वाचवला पण मालकासाठी स्वत:चा जीव मात्र गमावला आहे. त्यामुळे मालकाशी एकनिष्ठ असणाऱ्या या कुत्र्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

मालकाला अचानक आला ब्रेन स्ट्रोक –

हेही पाहा- जवान नव्हे जीवनदाता! CISF जवानांच्या कार्यतत्परतेमुळे बचावला प्रवाशाचा जीव; पाहा Viral Video

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना चीनमधील आहे. येथील एका ७८ वर्षीय व्यक्ती त्याच्या घरात एकटाच राहत होता. त्याच्यासोबत त्याने पाळलेला एक कुत्रा राहत होता. एक दिवस अचनाक या वृद्ध व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक आला त्यामुळे ते ते जमिनीवर पडले. घरात कोणी नसल्यामुळे ते तसेत पडून होते. मात्र, काही वेळाने कुत्र्याने आपल्या मालकाला खाली पडल्याचं पाहताच त्याने जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. कुत्र्याच्या या विचित्र भुंकण्यामुळे शेजारचे लोक वृद्ध व्यक्तीच्या घराजवळ गोळा झाले असता त्यांना तो वयोवृद्ध व्यक्ती बेशुद्ध होऊन जमीनीवर पडल्याचं दिसलं आणि त्यांनी लगेच त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं.

हेही पाहा- व्हिडीओ शूट करताना ड्रोनच्या आवाजाने भडकली मगर अन् घडलं भलतंच; पाहा Viral video

शेजाऱ्यांनी वृद्धाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. तो कुत्राही रुग्णालयात पोहोचला, मात्र आपल्या वृद्ध मालकाची अवस्था पाहून तेरुग्णालयामधून बाहेर निघण्यास तयार नव्हता. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ७८ वर्षीय व्यक्तीचे नाव यांग तर त्यांच्या पाळीव कुत्र्याचे नाव अवांग असं आहे.

दरम्यान, या कुत्र्याने आपल्या मालकाची अवस्था पाहिल्यामुळे त्याने खाणेपिणे बंद केले. सुमारे १५ दिवसांनंतर जेव्हा त्या वृद्धाची प्रकृती बरी झाल्यानंतर तो जेव्हा रुग्णालयातून बाहेर आला. मात्र, या १५ दिवसांमध्ये कुत्र्याने काहीही न खाल्ल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

हेही पाहा- नाद केला पण वाया नाही गेला! दाढीला लटकवल्या ७१० ख्रिसमस बेल्स, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला Video पाहाच

शेल्टर होममध्येच झाला मृत्यू –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा कुत्रा वृद्ध व्यक्तीसोबत अनेक वर्षांपासून राहत होता त्यामुळे त्याला त्या व्यक्तीची सवय झाली होती. त्यामुळे वृद्ध व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यापासून या कुत्र्याने अन्न आणि पाण्याचा त्याग केला. अखेर मालक बरा झाला पण कुत्र्याची प्रकृती बिघडली. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, मागील तीन-चार दिवसांत या कुत्र्याला जवळच्या शेल्टर होममध्ये पाठवण्यात आलं होतं, तो त्या ठिकाणी बरा होईल या उद्देशाना आम्ही पाठवलं होतं. मात्र, तो बरा झाला नाही आणि अखेर शेल्टर होममध्येच या कुत्र्याचा मृत्यू झाला.