सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हो कारण एका महिलेने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. या महिलेने सोशल मीडियावर पोस्ट करुन स्वत: या घटनेची माहिती दिली आहे. तिने सांगितलं की, नवऱ्याला आधी इशारा देऊनही तो माझ्या मनाविरुद्ध वागला, त्यामुळे मला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागत आहे. स्लेटच्या डिअर प्रुडन्स सल्ला स्तंभात सबमिट केलेल्या पोस्टमध्ये, एका अज्ञात महिलेने तिच्या लग्नाबाबतची पोस्ट शेअर करत आपण लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं सांगितलं आहे. पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे, सुरुवातीला मला लग्न करण्याची इच्छा नव्हती, पण २०२३ मध्ये जेव्हा प्रियकराने मला प्रपोज केले तेव्हा मी लग्नाला होकार दिला आणि दोघांनी लग्नाच्या तयारीच्या जबाबदाऱ्या आपापसात वाटूनही घेतल्या होत्या.
“माझी एकच अट होती…”
महिलेने पुढे सांगितलं की, माझी एकच अट होती की, लग्नाच्या दिवशी कोणीही विशेषत: माझा नवरा माझ्या चेहऱ्यावर केक लावणार नाही. मला खात्री होती की जर त्याने मला नीट ओळखले असेल तर तो अशी चूक करणार नाही. पण लग्नात त्याने मला न आवडणारे कृत्य केले. त्याने गंमतीने लग्न समारंभादरम्यान माझी मान पकडली आणि माझा चेहरा केकमध्ये घातला.
जाणूनबुजून केला प्रँक –
नवरीने पुढे म्हणाली, खूप समज देऊनही पतीने हे सर्व जाणूनबुजून केलं कारण त्याच्याकडे दुसरा केक आधीच तयार होता. त्यामुळे मला त्याची वागणूनक अजिबात आवडली नाही आणि दुसऱ्याच दिवशी मी त्याला हा लग्नाचा शेवट असल्याचं सांगितले. तसेच आपण पतीला माफ करावे आणि त्याला संधी द्यावी अशी माझ्या कुटुंबीयांची इच्छा असल्याचंही तिने सांगितलं.
हेही पाहा- रागवलेल्या महिलेने रेल्वे प्लॅटफॉर्मवरच नवऱ्याला उचलून आपटलं, VIDEO पाहताच नेटकऱ्यांना WWE आठवलं
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
या महिलेने तिला नवऱ्याचा राग का आला? हे सांगताना लिहिलं, “माझ्या पतीला हे समजायला पाहिजे होतं की, मी कार अपघातानंतर क्लॉस्ट्रोफोबिक आहे आणि त्यामुळे मी अशा गोष्टींना घाबरते.” तसंच तिने नेटकऱ्यांना मी पतीला माफ करावे का? असा प्रश्नदेखील विचारला होता. या पोस्टच्या कमेंटमध्ये अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं, “तुमच्या पतीची कृती ही रिलेशनशिप सुरू होण्यापूर्वी एक चेतावणी आहे आणि तुम्ही त्याच्यापासून पूर्णपणे वेगळे व्हा.” तर दुसर्याने लिहिलं, “अशा क्षुल्लक गोष्टीसाठी आयुष्य वाया घालवू नका.”