शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं असं म्हणतात, या वाक्याला साजेशी एक बातमी सध्या समोर आली आहे. ती म्हणजे एका आजीबाईंनी वयाच्या ८७ व्या वर्षी दुसऱ्यांदा मास्टर्स डीग्री मिळवली आहे. त्यांच्या या जिद्दीचं आणि शिकण्याच्या इच्छाशक्तीचं सध्या सोशल मीडियावर कौतुक केलं जातं आहे. अनेकवेळा आपल्याला वाटतं की, काही गोष्टी ठराविक वयातच करताय येतात. मात्र, वय म्हणजे फक्त एक आकडा असून तुमच्या मनामध्ये काही करण्याची जिद्द असेल तर तुम्ही नक्कीच इतिहास घडवू शकता आणि इतरांसाठी प्रेरणा बनू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही पाहा- ‘आजी जाऊ नको ना…’; बाहेर जाणाऱ्या मालकिणीला थांबण्याची विनंती करणाऱ्या कुत्र्याचा भावनिक Video पाहिलात का?

लोकांसाठी सध्या अशीच प्रेरणा बनल्या आहेत कॅनडातील रहिवासी असलेल्या वरथा शन्मुगनाथन (Varatha Shanmuganathan). कारण, शन्मुगनाथन यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी यॉर्क विद्यापीठातून दुसऱ्यांदा मास्टर्स डिर्गी मिळवली आहे. त्यामुळे शिकण्यासाठी कोणतं वय नसतं त्यासाठी फक्त तुमच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती हवी असं पुन्हा सिद्ध झालं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

वरथा शन्मुगनाथन या मुळ भारताच्या रहिवासी असून भारतामधूनच त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सिलोन विद्यापीठातून डिप्लोमा केला आणि लंडन लंडन विद्यापीठाच्या बिरबेक कॉलेजमधून त्यांनी खूप मेहनतीने पहिली पदव्युत्तर पदवी मिळवली. यानंतर २००४ साली कॅनडाला स्थलांतरीत झाल्या.

तर शन्मुगनाथन यांच्या या अविश्वनीय जिद्दीची दखल कॅनडातील नेते विजय थानिगासलम यांनी घेतली आहे. थानिगासलम यांनी वरथा शन्मुगनाथन यांच्या या कामगिरीचे कौतुक करत. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते तो वरथाचे या आजीबाईंचे खूप कौतुक केलं आहे. ‘अभ्यासाची आवड असेल तर या जगात काहीही शक्य आहे, वरथा शन्मुगनाथन या आमच्यासाठी प्रेरणास्थान असून त्या आपल्या देशात राहतात याचा आपणाला अभिमान आहे.’ असं विजय थानिगासलम यांनी इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तर ही आमच्यासाठी खरं प्रेरणास्थान असल्याच्या कमेंट नेटकरी देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trending story the age of 87 the grandmother achieved the second masters degree jap
First published on: 10-12-2022 at 09:20 IST