viral video: तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा लहान मुलांचे असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील किंवा त्यांना असं काही बोलताना ऐकलं असेल ज्याने तुम्ही भावूक झाला असाल. सोशल मीडियावर लहानग्यांच्या पराक्रमाचे अनेक व्हिडीओ फिरत असतात. आपण नेहमी म्हणत असतो ‘मुले देवाघरची फुले’ लहान मुलं किती निरागस असतात, मात्र कधी कधी मोठ्यांनाही लाजवेल असं काम लहान मुलं नकळत करुन जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या चिमुकलीनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
मुले देवाघरची फुले…
निरागस, गोंडस आणि अगदी निर्मळ मनाची ही चिमुरडी अनेक वेळा असं काही तरी बोलतात किंवा करतात की आपण सगळे अवाक् होतो. यांच्यासाठी ना कोणी मोठा ना कोणी लहान, ना कुठली जात, श्रीमंत काय आणि गरीब काय यांच्यासाठी सगळं एक सारखं असतं. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिमुकली रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका अंध व्यक्तीला मदत करताना दिसत आहे. आपण अनेक वेळा रस्त्याच्या कडेला बसलेले बेघर लोक बघतो. त्यांची आपल्याला दया येते मात्र काही वेळा आपण काहीच करु शकत नसतो.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो. ही चिमुकली रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका अंध व्यक्तीला तिच्या बॅगेतले काही पैसे देताना दिसत आहे. त्यानंतर ती बॅगेतला डबा काढते आणि त्यातील सँडविच त्या व्यक्तीला देते. यावेळी त्याला खायलाही ती मदत करतेय, नंतर ती त्या व्यक्तीला पाणी देते आणि जाता जाता हात मिळवते. तिच्यामधील हा दयाळूपणा पाहून प्रत्येक जण तिचं कौतक करतंय.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: इंग्लंडमध्ये गाजतंय हॉटेल “भाजीपाला”, महाराष्ट्रातील पदार्थांची अस्सल चव आता परदेशातही
हा व्हिडीओ पाहून नेटकरी मुलीचं खूपच कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर मुलीनं सगळ्यांचीच मन जिंकून घेतली आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.