नवरा-बायकोमध्ये छोटे-मोठे वाद, मजामस्ती होतच असते. सोशल मीडियावर नवरा बायकोचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नवरा बायकोच्या भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर कधी नवरा बायकोच्या प्रेमळ नात्यातला गोडवा दाखवणारे व्हिडीओ असतात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून तुम्ही पोट धरून हसाल. कारण या व्हिडीओमध्ये नवऱ्याने बायकोवर एक असा संदेश लिहिलाय जो वाचून तुम्ही कोणत्याही मूडमध्ये असले तरी चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा बायको दोघे बाईकवर बसून प्रवास करत आहेत. यावेळी आजूबाजूने जाणारे काही लोक त्या व्यक्तीला थांबवून त्याच्या बाईकवर लिहिलेल्या ओळींबद्दल विचारत असतात. त्याच्या बाईकवर पांढऱ्या रंगात काहीतरी ओळी लिहिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. बाईकवर लिहिले आहे की ‘बीवी से बहस, जिंदगी तहस नहस.’ बायकोशी वाद तर आयुष्य उद्धस्त होईल, असा या ओळींचा अर्थ आहे. बाईकवर लिहिलेल्या या ओळी वाचून तिथून जाणारे प्रत्येक जण जोरजोरात हसू लागले.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : रेल्वे ट्रॅकवर धावत होते दोन मुले, अचानक ट्रेन आली आणि….पुढे काय झालं पाहा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : वा रं पठ्ठ्या! अवघ्या एका सेकंदात सोडवलं रुबिक्स क्यूब, कसं ते पाहा हा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाईकवर लिहिलेली ओळ अप्रतिम आहे, जी पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा हसू आवरणं अवघड होईल. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘संस्कारी_विचार’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ४१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर तीन हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळे विनोद शेअर करण्यास सुरूवात केलीय. काहींना या ओळी वाचून आश्चर्य वाटत आहे, तर काहींना या ओळी वाचून हसून हसून त्यांची अवस्था बिकट झाली आहे.