आयपीएल सामन्यादरम्यान अनेक लोकांचे क्रिकेट आणि खेळाडूंवर असलेले प्रेम पाहायला मिळते. शिवाय त्याबाबतचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या आयपीएलशी संबंधित असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहे. शिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये एक तरुण स्टेडियममधील खुर्च्यांवर झोपून मोबाईलवर आयपीएलचा सामना पाहताना दिसत आहे.

स्टेडियममध्ये जाऊनही मोबाईवर मॅच पाहणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये, अनेक लोक मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत पण तिथे काही खुर्चा रिकाम्या असल्याचं दिसत आहेत. तर रिकाम्या खुर्च्यांवर एक तरुण झोपलेला दिसत आहे. त्याच्या हातात असलेल्या मोबाईलवर तो लाईव्ह मॅच पाहत असल्याचं पाहायला मिळत आहे. स्टेडियममध्ये मॅच पाहायला आला असताना हा तरुण मोबाईमध्ये मॅच पाहत असल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर, तो स्टेडियममध्ये आलाच कशाला? अशा कमेंट नेटकरी करत आहेत. तर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लखनऊ स्टेडियममधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही पाहा- “लग्नासाठी सरकारी नवरा…” बेरोजगार तरुणाने मुलींच्या पालकांना पोस्टरद्वारे केलं अनोखं आवाहन, स्टेडियमधील ‘तो’ Video व्हायरल

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया –

हेही पाहा- धक्कादायक! मुलाच्या जखमेला टाके घालण्याऐवजी लावलं फेविक्विक, डॉक्टरांचा निष्काळजीपणा उघड

हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने कॅप्शनमध्ये, “एवढ्या लांबून सामना दिसत नाही तर काय करु” असं लिहिलं आहे. तर व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिलं आहे, तो लखनऊचा नवाब आहे, ज्याला आपल्या शरीराला आणि मानेला कसलाही त्रास द्यायचा नाही. तर आणखी एका लिहिले की, स्टेडियममध्ये सामना पाहण्याची ही पद्धत सर्वात वेगळी आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने मॅच मोबाईमध्येच पाहायची होती तर तिकीट काढून स्टेडियममध्ये यायची आणि पैसे वाया घालवण्याची गरज काय होती? अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका युजरने “मोबाईलवरच मॅच बघायची होती तर, भावा तिथे गेलाच कशाला…?” असा प्रश्न विचारला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही लोकांनी असा दावा केला आहे की, हा व्हिडिओ स्टेडियममध्ये सामना सुरू झाला नव्हता आणि दुसऱ्या स्टेडियममधील सामना संपला नव्हता तेव्हा शूट करण्यात आला आहे. मॅच बघायला आलेला हा तरुण आधीच्या मॅचची अपडेट घेण्यासाठी लाईव्ह सामना पाहत होता. त्यावेळी कोणीतही त्याचा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.