सोशल मीडियावर आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ते कधी पोट धरून हसायला लावणारे, तर कधी अंगावर शहारा आणणारे असतात. अनेक लोक त्यांच्या आसपास घडणाऱ्या विविध घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करतात आणि ते फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यामुळे आपणालाही घरबसल्या आपण कधीही न पाहिलेली वेगवेगळ्या प्रकारची दृश्य पाहायला मिळतात.
सध्या असाच एका भल्यामोठ्या अजगराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा अजगर एवढा मोठा दिसतोय की त्याला पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. कारण, तुम्ही यापुर्वी अनेक प्राण्यांचे व्हिडीओ पाहिले असतील, त्यामध्ये ते भांडताना, शिकार करताना दिसतात. त्याच प्रकारचा हा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आहे. ज्यामध्ये एक भलामोठा अजगर कोंबड्याची शिकार करायला येतो पण त्याची स्वत:चीच शिकार झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.
कोंबड्याच्या मोहापायी अडकला –
कारण, अजगराची शिकार करण्यासाठी एका बहाद्दराने अतिशय हुशारीने सापळा लावल्यामुळे अजगर त्याच्या सापळ्यात अडकल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. अजगराला पकडण्यासाठी सापळा लावणाऱ्या शिकाऱ्याने एका कोंबड्याचा वापर केला आहे. अजगर कोंबड्याला बघताच त्याची शिकार करण्यासाठी भयंकर वेगाने येतो, पण त्याला कोंबडीपर्यंत पोहोचण्यासाठी एका निळ्या रंगाच्या पाईपमधून जावं लागतं. कोंबड्याची शिकार करण्याच्या मोहापायी अजगर गडबडीत त्या पाईपमध्ये शिरतो आणि त्याच वेळी सापळ्यात अडकतो. त्यामुळे शिकार करायला आलेल्या अजगराचीच शिकार झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
नेटकऱ्यांमध्ये मतभेद –
दरम्यान, हा व्हिडिओ oddly Terrifying नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला असून ‘जीवंत कोंबडा वापरून अजगराची शिकार’ असं कॅप्शन ट्विटर धारकाने व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाचं भावला आहे. त्यामुळे जवळपास १ लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे, तर ४९ लाख लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण, अनेक जणांनी ट्विटला रिप्लाई करत हा व्हिडीओ खोटा असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी “हे भयंकर वाटतं असलं तरीही वास्तव” असल्याचं म्हटलं आहे.