Viral video: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन लय हिट हायत भाऊ. ‘मेरा भारत महान’ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘जरा कम पी मेरी रानी, बहुत महंगा हें इराक का पानी’. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.

रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. पाहुया अशाच काही भन्नाट शायरी. तुम्हालाही नक्कीच तुमच्या जीवनातलं अर्ध ज्ञान इकडेच मिळालं असं वाटेल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. भारतभर असे स्लोगन पाहायला मिळतात. यातीलच आणखी एक डायलॉग सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या ट्रकच्या मागे लिहलं आहे की, “मन असेल तर प्रेम कर, भाड असेल तर फोन कर” हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DKZvWVjiPQA/?utm_source=ig_web_copy_link

एरवी, ट्रक व त्यांचे चालक शांतपणे आराम करताना पाहायचे असतील तर ढाबेच गाठावे लागतात. कारण, रस्त्यावर ते सतत धावत असतात.ट्रकचालक, क्लीनर सहा-सहा महिने घराच्या बाहेर असतात. ट्रक हेच आपले घर वाटावे, आपल्या मनातले इतरांना कळावे, हाच या पेंटिंगमागचा उद्देश. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, आपल्या ट्रकवरील नितांत प्रेम. इतर ट्रकपेक्षा आपला ट्रक एकदम मस्त दिसला पाहिजे, हाही उद्देश असतोच.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय.