Viral Video : नुकताच देशभरात फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फ्रेंडशिप डे स्पेशल अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास नातं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण मैत्री या नात्याला जपतात. सध्या सोशल मीडियावर दोन वृद्ध मित्रांचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन वृद्ध मित्र रस्त्यावरुन जात आहे. एका मित्राने दुसऱ्या मित्राचा हात पकडला आहे. मित्राचा आधार घेत दुसरा मित्र चालत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. म्हातारपणात मैत्री जपतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर “साथ साथ वो है मेरे गम मे मेरे दिल की हर खुशी मे” हे सुंदर गाणे लावले आहे.

हेही वाचा : Sushant Singh Rajput: अरे हा तर सुशांत… सेम टू सेम सुशांतसारखा दिसणारा हा तरुण आहे तरी कोण?

vijay.jat_ या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘यारी’ असे लिहिले आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, ” याला म्हणतात खरी मैत्री” तर एका युजरने लिहिले, “जेव्हा आधाराची गरज असते तेव्हा जो बरोबर असतो, तो खरा मित्र” आणखी एका युजरने लिहिले, “असा मित्र भेटायला चांगलं नशीब लागतं”