सोशल मीडियावर एका पाकिस्तानी महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोकांनी या व्हिडिओतील महिलेने तिच्या वडिलांशी लग्न केल्याचा दावादेखील केला होता. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता या महिलेचा तिच्या पतीबरोबरचा दुसरा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिने तिच्या वडिलांशी नव्हे तर, दुसऱ्या एका पुरुषाशी लग्न केल्याचं सांगितलं आहे. मात्र तिने ज्या व्यक्तीशी लग्न केलं आहे, त्याची ती चौथी पत्नी असल्याचंही महिलेने सांगितलं आहे.
राबियाचा व्हिडीओ व्हायरल –
घटनेतील महिलेचे नाव राबिया असे आहे, तर राबियाचा अर्थ चौथा क्रमांक किंवा चार अंक असा होतो, त्यामुळे, मी माझ्या वडिलांची चौथी मुलगी होऊ शकले नसले तरी मी माझ्या पतीची चौथी पत्नी बनली असल्याचं राबियाने म्हटलं आहे. सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो एका पाकिस्तानी महिलेचा असून तिचे नाव राबिया असे आहे. एका मुलाखतीदरम्यान राबियाने सांगितले की, राबिया म्हणजे चार, अनेकदा लोक चौथ्या मुलीचे नाव राबिया ठेवतात पण मी माझ्या आई-वडिलांची दुसरी मुलगी आहे. म्हणून मी एका अशा पुरुषाशी लग्न केले ज्याची आधीच तीन लग्न झाली होती त्यामुळे मी त्याची चौथी पत्नी बनली.
राबियाने लग्नाबद्दल केला खुलासा –
राबियाने मुलाखतीमद्ये सांगितलं की, ती तिच्या आई-वडिलांची चौथी मुलगी होऊ शकली नाही पण लग्नानंतर ती तिच्या पतीची चौथी पत्नी बनली. या व्हिडिओचा एक भाग शेअर करत काजल हिंदुस्तानी नावाच्या युजरने लिहिले की, “अरे देवा, मी हे काय ऐकत आहे.” शिवाय अनेकांनी तर या महिलेने तिच्या वडिलांशी लग्न केल्याची अफवा पसरवली होती. मात्र फॅक्टचेकरने महिलेच्या मुलाखतीचा पूर्ण भाग शेअर केल्यानंतर सत्य समोर आलं आहे. राबियाने सांगितले की, माझ्या पतीने याआधी तीन लग्न केली आहेत. मला त्याची चौथी पत्नी व्हायचे होते. मात्र, माझ्या घरच्यांना याबाबत माहीती नव्हती, शिवाय त्यांना याबाबत समजले असते तर त्यांनी लग्नाला होकार दिला नसता. त्यामुळे मी फक्त त्यांना मी ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहे, त्याचे याआधी एकच लग्न झाले असल्याचे सांगितलं होतं.
राबियाने पुढे सांगितलं, “घरच्यांनी लग्नाला होकार दिला आणि आम्ही लग्न केले. लग्नाच्या ६ वर्षांनंतर मी घरच्यांना ज्याच्याशी लग्न केले आहे, त्याची चौथी पत्नी असल्याचं सांगितले. शिवाय अनेकदा लोक त्यांच्या चौथ्या मुलीचे नाव राबिया ठेवतात. मी माझ्या आई-वडिलांची चौथी मुलगी नाही पण मी माझ्या पतीची चौथी पत्नी तरी बनले.”
