Desi Jugaad Video Viral : दिवसेंदिवस एकाहून एक जबरदस्त देशी जुगाडाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. घरगुती वस्तुंचा वापर करून महागड्या वस्तूंना आव्हान देण्यासाठी भन्नाट जुगाड केले जात आहेत. वाढत्या महागाईमुळे अनेकांच्या खिशाला कात्री लागली आहे. परंतु, काही माणसं महागड्या वस्तूंना खरेदी करत नाहीत. कारण स्वस्त आणि मस्त, या सूत्राचा वापर करून काही लोक देशी जुगाड करतात. पावसाळ्याचे दिवस असतानाही काही ठिकाणी गरमीला सामोरं जावं लागत आहे. खूप गरम झालं की, लोक हाताने टी शर्ट हालवून थंड हवा मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण एका तरुणाने आगळावेगळा जुगाड करून थंड हवा मिळवण्यासाठी एक मशिन बनवलीय. टी शर्टला मशिन लावल्यावर ती टी शर्ट आपोआप हालते आणि थंड हवा निर्माण करते. तरुणाच्या देशी जुगाडाचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तरुणाच्या जुगाडाचा हा व्हिडीओ ट्वीटरवर @Rainmaker1973 नावाच्या यूजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाल्याने गाजला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, गरमीत थंड हवा मिळवण्यासाठी शर्टाला लावण्यात येणारी मशिन. गरमीच्या दिवसात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला घाम फुटल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे गरमीने त्रस्त झालेल्या लोकांना २४ तास थंड हवा मिळवायची असते. परंतु, प्रत्येक वेळी हे शक्य नाही. मात्र, आता थंड हवा मिळवण्यासाठी एक मशिन बनवण्यात आली आहे. या मशिनला टी शर्टच्या खाली लावल्यानंतर तुम्ही थंड हवेचा अनुभव घेऊ शकता.

नक्की वाचा – Optical Illusion : फोटोत खार दिसतेय ना? पण ती खार नाही, क्लिक करून नीट बघा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इथे पाहा तरुणाने केलेल्या देशी जुगाडाचा व्हिडीओ

व्हिडीओत पाहू शकता की, एक तरुण टी शर्टच्या खालच्या भागात एक मशिन लावतो. त्यानंतर टी शर्ट हालायला सुरुवात होते आणि मशिनच्या माध्यमातून हवा दिली जाते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्सला एक प्रश्न पडला की, खरंच अशाप्रकारच्या मशिनची आवश्यकता आहे. काही लोकांना ही मशिन फायदेशीर वाटत आहे. तर काहींनी या मशिनचा वापर करण्यास मनाई केली आहे. १६ ऑगस्टला शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १६.५ मिलियन व्यूज मिळाले आहे. तर ५४ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.