‘फ्लाइंग कार’बद्दलच्या कनसेप्ट आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांनी हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये पाहिल्या असतील. इतकी वर्षं उडणारी गाडी हा सायन्स फिक्शनशी संबंधित असणारा विषय होता. पुष्पक विमानापासून ते आधुनिक काळातल्या विज्ञानकथांमध्ये एकतरी उडणारी गाडी असतेच. या दिशेन प्रचंड संशोधनही सुरू आहे. पण आता तुर्कीमध्ये याच फ्लाइंग कारची पहिली चाचणी पार पडली आहे. मेड इन तुर्की असणारी ही कार आपल्या पहिल्या उड्डाणमध्ये यशस्वी ठरली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ एबीसी न्यूजने पोस्ट केला आहे. रॉयटर्सने हा फ्लाइंग कारच्या पहिल्या उड्डाणाचा व्हिडिओ शूट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुर्कीतील पहिल्या फ्लाइंग कारणे इस्तंबूलमध्ये उढ्डाण केलं. पहिलं उड्डाण यशस्वी राहिलं,” अशा कॅप्शनसहीत हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. २ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये ही कार अनेक ठिकाणी उडत असल्याचे दिसत आहे. या पूर्वी तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या देशांमधील फ्लाइंग कार्सला हेलिकॉप्टर्सप्रमाणे पाती होती. मात्र तुर्कीमधील ही फ्लाइंग कार चार पंख्यांच्या मदतीने उड्डाण करताना व्हिडिओत दिसत आहे. हे केवळ एक प्रोटोटाइप आहे. या कारमध्ये दोन जणांना बसण्यासाठी जागा असल्याचेही दिसत आहे.

रिमोटवरुन ही फ्लाइंग कार कंट्रोल करता येते. या गाडीचा वेग, उंची या गोष्टींवर रिमोटवरुन नियंत्रण ठेवण्यात आलं होतं. मात्र भविष्यात या गाडीमध्ये सर्व नियंत्रण करणारी उपकरणे आणि कंट्रोल देण्यात येतील अशी शक्यता आहे. या गाडीला हेलिकॉप्टरप्रमाणे उतरण्यासाठी खालच्या बाजुला स्टॅण्ड आहेत. गाडी रात्रीचा अंधारतही चालवता यावी म्हणून गाडीला लाइट्सचीही सोय देण्यात आली आहे. ही गाडी बाजारात कधी उपलब्ध होईल यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नसतील तर हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

काही तासांमध्येच हा व्हिडिओ ६० हजारांहून अधिक जणांनी पाहिला आहे. या गाडीसंदर्भातील इतर माहिती लवकरच सार्वजनिक केली जाईल असं सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkey first flying car hovers over istanbul successfully completing its maiden test flight scsg
First published on: 18-09-2020 at 17:46 IST