विद्या बालनच्या ‘लेझी लेड सैय्या’ गाण्यावर दोन मुलींचा डान्स VIDEO VIRAL, व्हिडीओला ५ मिलियन व्ह्यूज; तुम्ही पाहिलाय का?

एक नवं चॅलेंज सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. लोक बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या ‘लेझी लेड’ या गाण्यावर वेगवेगळे डान्स स्टेप्स करत व्हिडीओ शेअर करत आहेत. यातलाच एका मोहक रीलने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा मूड नक्कीच फ्रेश होईल.

two-girls-dance-to-vidya-balans-lazy-lad-song-viral-video
(Photo: Instagram/ ryoona_thapa)

गेल्या लॉकडाउन काळापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या डान्स चॅलेंजच्या व्हिडीओंनी तुफान झेप घेतली आहे. ट्रेंड सॉंगवर वेगवेगळ्या प्रकारचे डान्स चॅलेंज करणाऱ्या लोकांच्या व्हिडीओंनी सोशल मीडिया पुरता व्यापून गेलाय. आता, आणखी एक नवं चॅलेंज सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. यात लोक बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या ‘लेझी लेड’ या गाण्यावर वेगवेगळे डान्स स्टेप्स करत आपला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. इन्स्टाग्रामवर यातलाच एक मोहक रीलने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात दोन मुलींनी विद्या बालनच्या ‘लेझी लेड’ गाण्यावर बड्या बड्या डान्सरलाही लाजवेल असा जबरदस्त डान्स केलाय. हा व्हिडीओ पाहून तुमचा मूड नक्कीच फ्रेश होईल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन मुली दिसत आहेत. या दोघी मैत्रिणी एका नयनरम्य डोंगराळ भागात घरावरील छतावर दिसून येत आहेत. सुरूवातीला एकमेकींना टाळीत देत नंतर या दोघी बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचं ट्रेंडींग सॉंग ‘लेझी लेड’ वर थिरकताना दिसून येत आहेत. या दोघींनी टी शर्ट परिधान करत डान्स करताना खूपच गोड दिसत आहेत. या मुली आपल्या पायाच्या हालचाली सोबतच हाताने देखील सारखेच डान्स स्टेप्स करत आहेत. त्या दोघीही अस्खलीतपणे डान्स करताना दिसत आहेत. या दोघींनीही इतका जबदरस्त डान्स केलाय की शकीराही या दोघींपुढे फिकी पडेल.

आणखी वाचा : रात्री अपरात्री कारमधून आल्या चोर आंटी आणि काय चोरी केली पाहा…VIRAL VIDEO पाहून तुम्ही पोट धरून हसाल!

पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

इन्स्टाग्राम यूजर रोना मंजरने हा व्हिडीओ अपलोड शेअर केला आहे. या दोघी मैत्रिणींचा डान्स परफॉर्मन्स नेटिझन्सना खूपच आवडला आहे. चेहऱ्यावरील क्यूट एक्प्रेशन्स आणि गाण्यावरील प्रत्येक बीटवर त्यांचे भन्नाट डान्स मूव्ह्स पाहून नेटकरी या दोघींच्या प्रेमात पडले आहेत. दोघी मैत्रिणींचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. या व्हिडीओमुळे २०१३ साली रिलीज झालेला अभिनेत्री विद्या बालनच्या ‘घनचक्कर’ चित्रपटातलं ‘लेझी लेड’ हे गाणं पुन्हा एकदा ट्रेंड होऊ लागलंय.

आणखी वाचा : अशा उड्या मारत पठ्ठ्याने एक दोन नव्हे… तब्बल पाच चारचाकी गाड्या केल्या पार, पाहा VIRAL VIDEO

या दोन मैत्रिणींच्या या डान्स व्हिडीओला आतापर्यंत ४.८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांचा हा डान्स पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आनंदीत झाले आहेत. या दोन मैत्रिणींना एवढा आकर्षक डान्स कसा जमला असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक उत्स्फूर्तपणे व्यक्त होत असून त्याला आपल्या अकाऊंटवर शेअरसुद्धा करत आहेत. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

‘लेझी लेड’ हे २०१३ साली रिलीज झालेल्या ‘घनचक्कर’ हा ब्लॅक कॉमेडी-ड्रामा चित्रपटातलं गाणं आहे. यूटीव्ही मोशन पिक्चर्समधील रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी निर्मित केलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिकेत आहेत. संगीत अमित त्रिवेदी यांनी दिले असून ते ऋचा शर्माने गायले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी गीते लिहिली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Two girls dance to vidya balans lazy lad song in viral video with 5 million views seen it yet google trend today prp

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या